आवंढीत शिवजयंती उत्साहत साजरी | आमदार विक्रमसिंह सांवत यांची उपस्थिती
आवंढी,वार्ताहर : आवंढी ता.जत येथे फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.राजे शिवराय ग्रुप छत्रपती चौक यांच्यावतीने जय भवानी चौकात शिवजंयती साजरी केली.समाज प्रबोधनावर भारुडाचा जुगलबंदी कार्यक्रम,लहान मुलाच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या होत्या.यावेळी जत तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम दादा सावंत यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी आ.सांवत यांना राजे शिवराय ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.माजी उपसरपंच प्रदीप कोडग यांनी आभार मानले.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,दगडू दादा, बबन कोडग,भारत महाराज कोडग,डॉ. अण्णासाहेब कोडग पाटील,दिनेश भाऊ सोळगे,ग्रामपंचायत सदस्य संजय येडगे, रामहरी दादा कोडग,बाबूराव कोडग,राजे शिवराय ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.शिवप्रतिष्ठान ग्रुप व छावा ग्रुप यांनी जिल्हा परिषद शाळेत साजरी केली. शिवचरित्र यावर आधारित किर्तन व रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या होत्या.अरुण कोडग यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी अमोल पाटील, विठ्ठल कोडग,अंकुश शिंदे चेअरमन माणिक पाटील,सुभाष कदम व ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.नवतरुण गणेश मित्र मंडळ शिवाजी नगर यांनी शिवाजी नगर येथे शिवजंयती विविध उपक्रमांनी साजरी केली.
संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा संरपच आण्णासाहेब कोडग याच्यांहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आंवढी ता.जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करताना आ.विक्रमसिंह सांवत व मान्यवर