Header Ads

डिजिटल सातबारे जतेत 99.15 टक्के काम पुर्ण 


 

जत,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शेतकर्‍यांना ऑनलाईन सात/बारा उतारा मिळावा शासनाच्या आदेशाप्रमाणे डिजिटल सहीचे ऑनलाईन उतारे थेट शेतकर्‍यांना देण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असून तालुक्यात 99.15 टक्के काम पुर्ण झाले आहे.तालुक्यातील आतापर्यत 96917 खातेदारापैंकी 96098 खातेदाराचे उतारे ऑनलाइन झाले आहेत.885 खातेदाराच्या किरकोळ तक्रारीमुळे कामे थांबली आहेत.त्यामुळे 400 वर शेतकऱ्यांचे उतारे येत्या महिन्याभरात पुर्ण होणार आहेत.तर उर्वरित खातेदाराचे अपिल लावण्यात आले आहेत.येत्या काही दिवसात या आपिलावर सुनावणी लावण्यात आली आहे.गेल्या तीन वर्षांपासून जत प्रशासनाच्या वतीने सुरू असलेले काम येत्या काही दिवसात पुर्ण होणार असून डिजीटल सातबारा देणारा जिल्ह्यातील पहिला तालुका जत ठरणार आहे.शेतीचा सातबारा ऑनलाईन मिळत नसल्याने शेतकर्‍यांना तलाठ्यांकडे हेलपाटे मारवे लागत आहेत.राष्ट्रीय भूमिअभिलेख कार्यक्रमांतर्गत डिजिटल सिग्नेचर पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र भल्या मोठ्या जत तालुक्यातील महसूली किचकट कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील, अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांच्या टीमने हे काम पुर्णत्वाकडे आणले आहे. अद्यापही शेतकर्‍यांना कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कामासाठी सातबारा उतार्‍याची गरज भासल्यास त्यांना तलाठ्यांकडेच जावे लागत आहे.तलाठी मात्र आपली फी दिल्याशिवाय कोणत्याही उतार्‍यावर सही करत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड शेतकरी करत आहेत.काही जमिनींच्या तक्रारी असल्याने तसेच सातबारा उतारे जुळत नसल्याने या भागातील काम अपूर्ण असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी असणारे क्षेत्र आणि उतारे जुळले की तालुक्यातील शंभर टक्के ऑनलाईन सातबारा उतार्‍याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.       

 

 

जिल्ह्यात डिजिटल सातबारे जतेतून मिळणार

 

डिजिटल सातबारा जत तालुक्यातील काम जवळपास पुर्णत्वाकडे आले आहे.तक्रारी असलेल्या खातेदारापैंकी 300 खातेदारांच्या तक्रारीवर पुढील आठवड्यापासून सुनावण्या लावण्यात आल्या आहेत.त्यानंतर तक्रारी संपविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात डिजिटल सातबारा देणारा जत प्रथम तालुका ठरेल.

 

- सचिन पाटील,तहसीलदार जत

Blogger द्वारे प्रायोजित.