Header Ads

पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सज्जड इशारा | कामे सुधारा अन्यथा कारवाई,ग्रामपंचायतीही बरखास्त होतील | चंद्रकांत गुडेवार


जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या बेजबाबदार कारभारावर जोरदार ताशेरे ओडत यापुढे चांगले काम करा अन्यथा कारवाईला सामोरे जाल असा सज्जड इशारा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी दिला.त्यांनी शुक्रवारी जत बचत भवन येथे अधिकारी,संरपच,ग्रामसेवकांची बैठक घेतली.यावेळी महिल व बालकल्याण सभापती सुनिता पवार,पंचायत समिती सभापती  मनोज जगताप,उपसभापती विष्णू चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, स्नेहलता जाधव,सुनील पवार,महादेव पाटील,संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग,तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, अण्णासाहेब गायकवाड,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.




जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात 14 वा वित्त आयोग अखर्चित निधी,ग्रामपंचायतीच्या वसूलीवर तीव्र नाराजी शब्दात नाराजी व्यक्त केली.यापुढे ग्रामपंचायतीचा कारभार बदलावा,अनियमितपणा,अकार्यक्षमता,वसुली, निधी अखर्चित राहिल्यास ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येईल,असा इशाराही गुड्डेवार यांनी दिला.कर वसुली, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री घरकुल योजना,रमाई योजना ,दलित वस्ती सुधार योजना या विभागाच्या आढावा या बैठकीत गुड्डेवार यांनी घेतला.अनेक ग्रामपंचायतीच्या अडचणी समाजवून घेत जागेवर निकाली काढल्या.ग्रामपंचायतीच्या अपेक्षीत  करवसूली नसणे गंभीर बाब असल्याचे सांगत ग्रामपंचायतीचा विकास साधण्यास अडचणीचे ठरत आहे.शासनाच्या निधीतून होत असलेल्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी नागरिकांनी योजगदान द्यावे.कामे दर्जाहीन होत असल्यास आमच्याकडे तक्रार करा अशा सुचना दिल्या.पाणी पुरवठ्यासह अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचे अंदाज पत्रक वेळेत केली जात नसल्याच्या तक्रारी काही संरपचांनी मांडल्या.उपस्थित शाखा अभिंयत्यांना जाब विचारत कारभार सुधारा अन्यथा अडचणीत याल असे सुनावले.पाणी योजनाची कामे अंदाजपत्रकानुसार  तातडीने करण्याच्या सुचना यावेळी गुड्डेवार यांनी दिल्या,तातडीने कामे करा वेळ झाल्यास ठेकेदारास नुकसान होते,त्यामुळे गती वाढवा,30 एप्रिलला पुन्हा आढावा घेण्यात येईल असेही गुड्डेवार यांनी सांगितले.तालुक्यातील ग्रामपंचायतीची सातत्याने तपासणी करण्याचे आदेश बिडीओ धरणगुत्तीकर यांना दिले.राजकीय दबाव आल्यास अशा ग्रामपंचायती मी तपासतो असे यावेळी सांगितले.अनेक ग्रामपंचायतीत निविदा प्रक्रिया राबविली जाते.ती मँनेजही केली जाते.यावर बैठकीत ग्रामसेवक व संरपचात जुंगलबंदी पाह्याला मिळाली.




 




 




तळ ठोकलेल्या अधिकाऱ्यांना हलवा




 





जत पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात अधिकारी,कर्मचारी उपस्थित नसतात.त्यामुळे तक्रारी वाढत आहेत.त्याशिवाय अनेक विभागात अधिकारी,कर्मचारी गेल्या 10-15 वर्षापासून तळ ठोकून आहेत.त्यांच्या बदल्याचा शासकीय नियम संपला तरीही बदल्या झालेल्या नाहीत.अनेक वर्षापासून असल्याने मुर्दाड झालेले हे अधिकारी संरपचासह,नागरिकांची हेळसाड करतात,असा महत्वाचा मुद्दा सरपंच परिषद तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी मांडला.याला अनेक संरपचांनी साथ दिली.दरम्यान याबाबत चौकशी करून कारवाई करू असे उत्तर गुड्डेवार यांनी यावेळी दिले.




         





 




 




कुंभारीत सदस्याच्या अडमुठेपणा




 




कुंभारी ता.जत येथील सदस्य विकास 14 व्या वित्त आयोगासह अन्य विकास कामांना राजकीय हेवेदाव्यामुळे अडफाटा घालतात.त्यामुळे मासिक सभेत ठराव मंजूर होत 




नसल्याचा गंभीर प्रकार संरपच राजाराम जावीर यांनी गुड्डेवार यांच्या समोर मांडला.यावर हा गंभीर प्रकार 




असल्याचे सांगत विकास कामात अडफाटा घालणाऱ्या सदस्याचे अपात्रतेचे प्रस्ताव पाठवा,अशा सुचना विस्तार अधिकाऱ्यांना दिल्या.




 




 




 




 



Blogger द्वारे प्रायोजित.