पोलीसांच्या ताब्यातून संशयित आरोपी पळाला

जत,प्रतिनिधी : उमदी पोलीसाची नजर चुकवून एका संशयित आरोपीने पलायन केल्याची घटना व्हसपेठ नजिक शुक्रवारी सायकांळी घडल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, पुर्व भागातील एका गावातील एका तरूणांने युवतीस फूस लावून पळवून नेहले होते.त्यांचा गुन्हा उमदी पोलीसात दाखल झाला होता.त्याचा तपास करत पोलीसांनी संबधित युवती व तरूणास रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. शुक्रवारी तरूणास पोलीसांनी जत न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावल्यानंतर उमदी पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना व्हसपेठ नजिक असणाऱ्या डोंगरावर संशयिताने लघूशंकेसाठी पोलीस गाडी थांबविण्यास सांगितले.खाली उतरताच पोलीसांना चकवा देत तेथून धूम ठोकली. पोलीसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो गायब झाला.उमदी,जत पोलीसांनी त्यांच्या तपासासाठी रात्री उशिरापर्यत छापामारी सुरू होती.मात्र संशयित सापडला नसल्याचे वृत्त आहे.या घटनेने पुन्हा जतेत खळबळ उडाली आहे.दरम्यान रात्री उशिरापर्यत उमदी पोलीस ठाण्याकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही.