Header Ads

कॉग्रेसच्या महिला आघाडी तालुकाध्यपदी सलिमा मुल्ला


 


जत,प्रतिनिधी : जत कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी पांडोझरीच्या माजी आदर्श संरपच सौ.सलिमा मुल्ला यांची निवड झाली.त्याचा जत येथील सत्कार सोहळ्यात कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कृषी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आ.मोहनशेठ कदम,विक्रमसिंह सांवत,तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,कार्याध्यक्ष नाना शिंदे, नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर, सलीम पाच्छापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वाधिक कार्यक्षम महिला संरपच म्हणून त्यांचा तालुक्याला परिचय आहे.पांडोझरी गावातून त्यांनी राजकीय जीवनाला सुरूवात केली आहे.कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात,ना.कदम व जतचे आमदार सांवत यांनी महिला संघटनाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.निवडीनंतर बोलताना सौ.मुल्ला म्हणाल्या,कॉग्रेस नेत्यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करीन,तालुक्यात कॉग्रेसचे महिला संघटन वाढविण्याबरोबर कॉग्रेसचे विचार तळागाळापर्यत रूजविण्यासाठी मी काम करेन.महिल्या न्याय हक्कासह,त्यांना रोजगार मिळविण्यासाठी कॉग्रेसचे माध्यमातून प्रयत्न करेन असे शेवटी सौ.मुल्ला म्हणाल्या.   
 
 
जत : जत तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सौ.सलिमा मुल्ला यांचा सत्कार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.Blogger द्वारे प्रायोजित.