Header Ads

संख पाणी योजनेचा निधी अखेर जिल्हा परिषदेला वर्ग 

 


जत,प्रतिनिधी : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमा अतर्गंत संख 20,व 9 वाडीवस्ती नळपाणी पुरवठा योजनेचा अनेक दिवसापासून संख ग्रामपंचायतीकडे असलेला थकीत निधी व्याजासह 2 कोटी 7 लाख 80 हजार 740 जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे अखेर ग्रामपंचायतीने वर्ग केला.संख पाणी पुरवठा योजनेचे पहिल्या टप्यातील काम पुर्ण करण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षापासून या पाणी योजनेच्या निधीवरून वादविवाद सुरू होते. स्थानिक समितीकडून काम व्यवस्थित झाले नाही.म्हणून ठेकेदारास निधी वर्ग करण्यास विरोध होता.तर कामे पहिल्या हप्त्यात दिलेल्या निधीपेक्षा जास्त झाली आहेत.त्यामुळे निधी मिळावी म्हणून ठेकेदारांचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू  आहे.सध्या या योजनेच्या पहिल्या टप्यातून गावाला काही प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान पाणी योजनेच्या कामाची चौकशी व्हावी म्हणून स्वा.शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठे आदोलंन करण्यात आले होते.आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सांगलीतील जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा कार्यालयाची तोडफोड केली होती.त्यानंतर आंदोलकांना जेलमध्ये बसावे लागले होते.योजनेच्या कामाची चौकशी करावी अशी त्यांची आजही मागणी कायम आहे.अशा सततच्या वादाने ग्रस्त झालेल्या या योजनेचा निधी अखेर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभिंयते डी.जी.सोनवणे यांनी निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात यावा असे पत्र दिले होते.त्यानुसार ग्रामपंचायतीने हा निधी वर्ग केला आहे. त्यामुळे येथून पुढचे काम नेमके जिल्हा परिषद करणार का पुन्हा रखडणार असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 



 

 

ग्रामपंचायतीकडे पाणी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे सुमारे एक कोटी आंशी लाख रूपये आले होते.मात्र पाणीपुरवठा समिती व वरिष्ठ विभागाच्या सुचनेनुसार ते पाणी पुरवठा समितीला दिले नव्हते.अखेर पाणी पुरवठा विभागाच्या अभिंयते डी.जे.सोनवणे यांच्या पत्रा अन्वेय व्यासह दोन कोटी 7 लाख 80 हजार रूपये इतकी रक्कम आम्ही जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग केली आहे. पुढील कारवाई जिल्हा परिषद करणार आहे. 

 

श्री.के.डी.नरळे,ग्रामसेवक संख


Blogger द्वारे प्रायोजित.