Header Ads

आवंढी ग्रामपंचायत इमारतीचे भुमिपूजन 

 


 

आंवढी,वार्ताहर : आवंढी ता.जत येथील  ग्रामपंचायत नविन इमारतीचा भूमीपुजन सोहळा आजी-माजी सैनिक व महिला सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडकळीस आली होती.संपूर्ण गावाने एकत्र येऊन पाणी फौंडेशनचे उल्लेखनीय काम गावात केले होते.यां कामाची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी आवंढी गावाला भेट दिली होती.त्यावेळी इमारतीसह दोन रस्त्यासाठी निधी व जागा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी काळम-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आवंढी - सोनंद रस्ता,आवंढी- सिंगणहळळी रस्ता, नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी लागणारी जागा,ग्रामपंचायत इमारतीसाठी लागणारा निधी मंजूर करून दिला आहे.

या नवीन ग्रामपंचायत इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला.यावेळी आजी माजी सैनिक,ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य,सोसायटीचे आजी माजी सदस्य,शिक्षक,तरुण मित्रपरिवार,राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील ग्रामपंचायतीची जूनी इमारात कालबाह्य झाली आहे.नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार लवकरच सर्वाच्या सहकार्याने नवीन जागेत ही भव्य इमारत उभारणार आहे,अशी माहिती संरपच आण्णासाहेब कोडग यांनी दिली.

 

 

आंवढी ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमीपुजन आजी माजी सैनिकांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

Blogger द्वारे प्रायोजित.