Header Ads

महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरे भाविकांनी गजबजली

 


 

जत,प्रतिनिधी : हर हर महादेव, बम् बम् भोलेच्या गजरात प्राचीन, ऐतिहासिक असलेल्या शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार(दि.21)जत तालुक्यातील दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक मंदिरात शिवपिंडीला पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला.जतसह परिसरातील विविध ठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त परिसरातील विविध शिव मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे.शिवरात्रीनिमित्त सर्वच शिवमंदिरांत दर्शनासाठी भाविक पोहचत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अनेक मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना कोळी व खिचडी वाटप करण्यात आली.

 

 

 जत शहरातील प्रसिद्ध श्री.बंकेश्वर मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

Blogger द्वारे प्रायोजित.