Header Ads

डफळापूर ग्रामपंचायतीच्या करांची वसूली आजपासून पं.स.चे पथक करणार


 डफळापूर ग्रामपंचायतीच्या करांची वसूली आजपासून पं.स.चे पथक करणार
डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या विविध कराच्या रक्कमेची वसूली 27 फेब्रवारी पासून पंचायत समितीचे पथककरणार आहे, नागरिकांनी यांची नोंद घ्यावी,असे आवाहन ग्रामसेवक एस.एस.कोरे यांनी केले.

ग्रामपंचायतीचे घरपट्टी,पाणीपट्टी व इतर कर मोठ्या प्रमाणात थकीत आहेत.नागरिकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मागणी करूनही कर भरणा केला जात नाही.त्याचा फटका विकास कामावर होत आहे.त्यामुळे यापुढे या थकीत करांची वसूली पंचायत समितीचे पथकाकडून होणार आहे. पथकाला कर वसूली सक्तीने करण्याचे आदेश असल्याचेही यावेळी कोरे यांनी सांगितले.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.