Header Ads

| डफळापूर | दोन महिन्यात डफळापूर योजना पुर्ण करा | जि.प.कार्यकारी अभिंयते डी.जे.सोनवणेचे आदेश : योजनेच्या कामाची पाहणी


 




दोन महिन्यात डफळापूर योजना पुर्ण करा 

जि.प.कार्यकारी अभिंयते डी.जे.सोनवणेचे आदेश : योजनेच्या कामाची पाहणी


 

 

डफळापूर, वार्ताहर : डफळापूरच्या पाणी योजनेसाठी जलशुध्दीकरण केंद्र,अतर्गंत पाईपलाईन,उंच टाकी,शुध्ददाब नलिका कामासाठी तीसरा हप्ता आठ दिवसात देतो,दोन महिन्यात शुध्दीकरण यंत्रणा अन्य कामे पुर्ण करा अशा सुचना
जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभिंयते डी.जे.सोनवणे यांनी दिल्याचे लेखापाल समितीचे अध्यक्ष दिग्विजय चव्हाण यांनी सांगितले.

पेयजल पाणी योजनेच्या कामाची जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभिंयते डी.जे.सोनवणे,उपअभियंता उदय देंशपाडे,शाखा अभियंता आर.डी.माळी,श्री.महाजन यांनी पाहणी केली.सर्व कामे नियमानुसार व चांगली झाल्याचे सोनवणे यांनी यावेळी सांगितल्याचे चव्हाण यांनी सांगितले.डफळापूर पाणी योजनेच्या अनेकवेळा तक्रारी झाल्याने काम रखडले होते.तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत कोणेतही दोष आढळलेले नाहीत.यांची माहिती सोनवने यांना चव्हाण यांनी दिली.सध्या गावाला पाण्याची मोठी अडचण आहे.स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी ही योजना लवकर पुर्ण करण्याची गरज आहे. त्यामुळे महत्वाच्या टप्यासाठी निधी मिळावा अशीही मागणी चव्हाण यांनी सोनवने यांच्याकडे केली.

दरम्यान योजनेचा पहिल्या टप्याचे काम पुर्ण झाल्याने तो टप्पा ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा,रखडलेल्या जलशुध्दीकरण,दाब नलिका व अन्य प्रमुख कामासाठी दुसरा निधी लवकर देण्यात येईल,सध्या आलेला निधी 26  वाड्यावस्त्यासाठी आला आहे.त्यांचीच कामे करावीत.अशा सुचना यावेळी सोनवने यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,माजी सभापती मन्सूर खतीब,पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,तांत्रिक सल्लागार के.डी.मुल्ला उपस्थित होते.

 

डफळापूर पाणी योजनेच्या कामाची पाहणीवेळी सुचना देताना जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभिंयते डी.जे.सोनवणे




 


Blogger द्वारे प्रायोजित.