Header Ads

करजगीत घरास आग ; सव्वा लाखाचे नुकसान  


 करजगीत घरास आग ; सव्वा लाखाचे नुकसान 
 

करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत मरमसाब मस्तान जतकर यांच्या राहते घर अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले.त्यात संसारउपयोगी साहित्यासह रोख 20 हजार,अर्धा तोळे सोन्याचे दागिणे असे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले.करजगी मोरबगी रोडला जतकर यांचे घरवजा छप्पर आहे.शनिवारी सकाळी अचानक घरास आग लागली.बघता बघता आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.घटनास्थळी जेष्ठ नेते डॉ.बशीर बिराजदार,संरपच साहेबपाशा बिराजदार,उपसंरपच साबू बालगाव यांनी भेट दिली.तलाठी श्री.बामणे यांनी पंचनामा केला.

 

करजगी ता.जत मरमसाब जतकर यांचे आगीत घराचे झालेले नुकसान. 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.