Header Ads

जत पुर्व भागाचा दुष्काळ कायमचा हटवू | आ.विक्रमसिंह सांवत | बोर्गीतील संरपचासह सदस्याचा कॉग्रेसमध्ये प्रवेश


 
 

जत पुर्व भागाचा दुष्काळ कायमचा हटवू

 

आ.विक्रमसिंह सांवत : बोर्गीतील संरपचासह सदस्याचा कॉग्रेसमध्ये प्रवे

 

बालगाव,वार्ताहर : देशात,राज्यात कॉग्रेस पक्ष स्थिरता देऊ शकते.जत तालुक्यातील पुर्व भागातील पाणी प्रश्नासह दुष्काळ कायमचा हटवू,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.

बोर्गी ता.जत येथील सत्ताधारी संरपचासह अनेक सदस्यांनी कॉग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्यात बोर्गी बु.चे सरपंच सौ.गुरनिगव्वा श्रीशैल बिरादार,ग्रा.प.सदस्य गिरजबाई माळकरी कांबळे,दावल बादशाह पळूजकर,सुशिला शिवाप्पा कोळी,रिहान मताब सनदी,तमाराय हणमंत बिरादार,सौ.सुगला सिद्रया मलाबादी,शिवराज शेडबाळ, गगणगौडा पाटील,मलाप्पा बिराजदार,रमेश उमराणी,प्रवीण अंकलकोट,यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यांचे स्वागत आ.सांवत व कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केले.

आ.सांवत म्हणाले,सध्या राज्यात कॉग्रेस पक्ष सत्तेत आहे.मीही आमदार आहे.

त्यामुळे तालुक्यातील विविध योजनासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तालुक्याला मोठा निधी मिळणार आहे. जत पुर्व भागातील सर्वात मोठा प्रश्न असणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.या भागात सिंचन योजनेतून पाणी फिरवून दुष्काळ कायमचा मिटविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.कॉंग्रेस पक्षात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल,असेही आ.सांवत शेवटी म्हणाले.

यावेळी माजी मार्केट कमिटी सभापती संतोष पाटील,जत तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्ष सौ.सलीमा मुल्ला,जत पं.स.सदस्य दऱ्याप्पा हत्तळी,राजेंद्र खवेकर,माजी मार्केट कमिटी संचालक संजय सावंत,डॉ,बशीर बिराजदार,पुजारी सर,भाऊ मोरे,व बोर्गी बु.बोर्गी खु.परिसरातील कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

बोर्गी ता.जत येथील पदाधिकाऱ्यांचे कॉग्रेस पक्षात स्वागत करताना आ.सांवत
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.