Header Ads

अवकाळीचे वंचित शेतकऱ्यांना अनुदान द्यावे ; संभाजी बिग्रेड
 
 

आंवढी,वार्ताहर : बेवनूर ता.जत येथे ऑक्टोंबर 2019 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान तातडीने मिळावे अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, गावातील शेतकऱ्यांचे ऑक्टोंबर 2019 मध्ये अवकाळी पावसामुळे उभ्या पिकासह फळपिकांटे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्याचे पंचनामे सुध्दा झालेले आहेत.त्यानुसार काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळालेली आहे.परंतु अनेक शेतकऱ्यांना पंचनामे होऊन सुध्दा नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही.यांची सखोल चौकशी होऊन वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवी.वेळेत अनुदान न मिळाल्यास वंचित शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक,शंकर पारेकर,अँड.मदन नाईक,बयाजी सरगर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

 

 


बेवनूर मधील अवकाळीपासून वंचित शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन संभाजी बिग्रेडच्या वतीने देण्यात आले.

 

   

Blogger द्वारे प्रायोजित.