Header Ads

दीपक अंकलगी राज्यस्तरीय 'आदर्श सेवा' पुरस्कार घोषित


 




 

दीपक अंकलगी राज्यस्तरीय 'आदर्श सेवा' पुरस्कार घोषित

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील येळवी येथील केंद्र शासन पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगी यांना सीबीएस न्यूज़ मराठी परिवार व युवा पत्रकार असोसिएशन यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सेवा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

येत्या 22 फेब्रुवारी रोजी सांगोला पंचायत समितीच्या बचत भवन येथे माजी आमदार गणपतराव देशमुख, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

दीपक अंकलगी यांनी लोकहिताचे अनेक उपक्रम राबवित येळवी सारख्या छोट्या गावाचे नाव उज्वल केले आहे.ओंकार स्वरूपा फाउंडेशन संस्थेच्या वतीने येळवीत इंग्लिश मेडियम स्कूलची स्थापना,ओंकार स्वरूपा कन्यारत्न ठेव योजनेअंतर्गत 10 मुलींना प्रत्येकी 3000 रुपये ची ठेव, ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाचे 300 स्मार्ट कार्ड काढले, महिलांसाठी फॅशन डिझाईन कोर्स, अपघातात मयत झालेल्या कंत्राटी वीज कामगाराला 25 हजारांची संस्थेकडून मदत यासह  वीर पत्नी, माजी सैनिक ,सैनिक पत्नी यांचा गौरव समारंभ , दरवर्षी रक्तदान शिबिर, नवमतदार नोंदणी अभियान, पाणी फाउंडेशन कामात सहभाग, प्रशिक्षणात संस्थेचा सहभाग, युवा संसद परिषद, गावातील उल्लेखनीय कार्यकर्तृत्वांचा गौरव सोहळा, लेक वाचवा अभियान व जलसंधारण प्रबोधनात्मक व्याख्याने, पॅन कार्ड ,आधार कार्ड ,रेशन कार्ड ,नाव नोंदणी शिबीर, ज्येष्ठ नागरिक कार्ड, गुणवंत विद्यार्थी गौर,तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, भव्य रेकॉर्ड स्पर्धा, केरळ पुरग्रस्थासाठी संस्थेकडून आर्थिक मदत, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल खेत हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.






Blogger द्वारे प्रायोजित.