Header Ads

उमदीत पुन्हा पेट्रोल डिजेलचा तुटवडा 


 उमदीत पुन्हा पेट्रोल डिजेलचा तुटवडा
 

जत,प्रतिनिधी : उमदी ता.जत येथे शासनाच्या कंपन्याचे दोन पेट्रोल पंप आहेत.मात्र तेथे चार चार दिवस पेट्रोल,डिजेल नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह वाहन धारकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यांची चौकशी करून दोन्ही पंपावर कायमस्वरूपी पेट्रोल,डिजेल उपलब्ध करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा पाणी संघर्ष समिती व क्रांती युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसापासून येथे पेट्रोल, डिजेल उपलब्ध नाही.त्यामुळे शेतीसाठी टँक्टर,वाहने,दुचाकींना पेट्रोल डिजेल मिळत नाही.त्यामुळे पंधरा किलोमीटरवरील चडचडण वरून तेल आणावे लागत आहे. सातत्याने असे प्रकार घडत आहेत.तेल कंपन्याच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाने यात लक्ष असे आवाहन फिरोज मुल्ला व रवी शिवपुरे यांनी दिला आहे.
 


Blogger द्वारे प्रायोजित.