Header Ads

संखात मटका जोमात | दारू गुत्तेही वाढले :अवैध धंद्यांकडे पोलिसांचा कानाडोळा


संख,वार्ताहर : संखसह परिसरातील ग्रामीण भागात मोठ़या प्रमाणावर मटका, जुगार सुरू असून, हॉटेल-ढाब्यांसह अनेक ठिकाणी देशी-विदेशी व हातभट्टी दारूची विक्री विनापरवाना राजरोसपणे सुरू आहे. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे अवैध धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत असून,नागरिक पोलीस व त्यांच्या अधिकार्‍यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत असून, त्यांच्या बदलीची मागणी जोर धरू लागली आहे.संख चौकीचे पोलिस कारवाई करत नसल़्याचे हे चित्र स्पष्ट असूनही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे.परिणामी अवैध धंदेवाले पोलिसाच्या आर्शिवादाने सुसाट आहेत.अनेक गावात शाळा परिसर,सार्वजनिक ठिकाणी दारू गुप्ते,मटकाची दुकाने थाटली असून यामुळे बालमनावर वाईट परिणाम होत आहे.उमदी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या संख गावांमध्ये अवैध धंदे फोफावले आहेत. अनेक वर्षांपासून गावातील अनेक गल्लोगल्ली मटका-जुगाराचे अड्डे सुरू असून, त्यात सहा महिन्यांपासून वाढ झाली आहे.परिसरातील ग्रामीण भागात हातभट्टीची दारू आणून विकली जाते. दिवसेंदिवस सदरच्या अवैध धंद्यात वाढ झाली असून,  नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मात्र, पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक बोलत आहेत.अनेक गावात मोठया प्रमाणात जुगाराचे अड्डे असून, देशी-विदेशी व हातभट्टीची विक्री केली जाते.त्यामुळे अनेक गावातील तरुण व्यसनाच्या मार्गी लागल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावागावात भांडण-तंटे वाढत आहेत.शिवाय, ही दारू (डुप्लीकेट) दूषित व खराब असल्याने दारू पिणार्‍यांची नशा दिवसभर उतरत नाही.अनेकजण दारू प्यायल्याने दिवसभर रस्त्यात पडून असतात.तर काहीजण मरण पावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या धंद्यांना अभय मिळत असल्याचेही बोलले जाते.संख सह परिसराला या व्यवसायाने विळाखा घातला असून सतत यावर बातम्या येऊनही संख चौकीतील पोलिसाना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खतपाणी मिळत असल्याने ते बिनधास्त आहेत.त्यांना संख परिसर वरिष्ठाकडून अंदन मिळाल्यागत स्थिती बनली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.