Header Ads

पोलिस चेकपोस्ट नव्हे, वसूली पोस्ट | कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवरील कोंतेबोबलाद पोलीस चेकपोस्ट मधील प्रकार


जत,प्रतिनिधी : पंढरपुर -विजापुर या महामार्गावर उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोतेंबोबलाद येथे महाराष्ट्र व कर्नाटकतील आंतरराज्यीय चेकपोस्ट बांधण्यात आली असून येथे विना नेमणूक झिरों पोलिसाकडून अनेक वाहनधारकांची लुबाडणूक सुरू आहे.येथे कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी हे चेकपोस्ट वरती दाखवा व बक्षिस मिळवा अशी पैज बांधण्याची वेळ सर्वसामान्य नागरिक तसेच प्रवाशांवरर्ती आली आहे.त्यामुळे हि चेकपोस्ट नव्हे वसुली पोस्ट असल्यांचा आरोप नागरिकातून होत आहे.

कोतेंबोबलाद येथील तपासणी नाका येथे उमदी पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी यांची कायमस्वरूपी नेमणुक केली असली तरी संबधित पोलिस कर्मचाऱ्यांनी मात्र त्याच्या सोयीसाठी झिरों पोलिसाची नेमणूक केली आहे. हे झिरों पोलिस म्हणजे बिन पगारी व फुल अधिकारी आहेत.हे झिरो पोलीस अनेक वाहनधारकांची व प्रवाशांची लुबाडणुक करत आहेत.लग्न सराई अनेक भागातून लोक जगातील सात आश्चर्या पैंकी विजापुर येथील गोलघुमट पहाण्यासाठी या मार्गावरून ये-जा करत असतात. विजापूरला जाताना अथवा लग्न कार्यासाठी प्रवास करत असताना कोतेंबोबलाद येथील चेकपोस्ट वरुन जावे लागते. अशा वाहनाना चेकपोस्ट वरती एका वाहन धारकांकडून  500 ते 1000 रुपये झिरों पोलिसानकडून वसुली केले जात असल्यांचा वाहनधारकाचा आरोप आहे. त्यातून राज्य किंवा जिल्ह्याबाहेरील नंबरचे वाहन दिसल्यास झिरों पोलिसांची चंगळ होत असल्याची चर्चा आहे.अशा वाहनधारकाना अडवणूक करून कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली काही हाजांराची वसूली होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच वाहन धारकांना संबधित रक्कमेची पावतीही दिली जात नाही. त्यामुळे हे चेकपोस्ट थेट वसूलीची चेकपोस्ट बनविली आहे.                      येथे नेमणूक असलेले पोलिस कर्मचारी वाळू,गांज्या व दारु तस्कारांच्याक कडून हप्ते वसूलीच्या कामगिरीवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही मोठ्या रक्त म  ठरवून संबधित चेकपोस्टचा ताबा मात्र पोलिस नसताना झिरों पोलिसांकडे दिला आहे. नेमणुक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच चेकपोस्ट कुठे आहे? असे विचारावे लागत आहे. तसेच हे चेकपोस्ट महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवरर्ती

असल्याने येथूनच अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. तसेच या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहणे जाणे,गांज्या, चंदन तस्करी, वाळू तस्करी ही संबधित पोलिसांच्या आशिर्वादाने चालत आहे.

 

 

ठाणे प्रमुखांकडूनही वर कमाई

 

उमदी पोलीस ठाण्याला लुटीचे ग्रहण कायम आहे.अवैध धंदे,प्रकरणे मिटवून सामान्य जनतेचे पैसे लुटण्याच्या प्रकाराचा माजी आमदारांकडून अनेकवेळा भांडाफोड केला आहे.येथे नेमलेले ठाणेदारही पैसे जास्त मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेहरबान असल्याचे बोलले जात आहे.तेच कर्मचारी ठाण्यातील प्रकरणे तडजोडीत अग्रेसर असतात.

 

जत : महाराष्ट्र व कर्नाटकतील राज्य सिमावर्ती असणारी उमदी पोलिस स्टेशन अतर्गंतची चेकपोस्ट

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.