Header Ads

शिक्षक समितीची उद्या राज्यस्तरीय शिक्षक परिषद 


 




शिक्षक समितीची उद्या राज्यस्तरीय शिक्षक परिषद

 

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रविवारी एक मार्च रोजी अंकलखोप (ता. पलूस) येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषद व

सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षक समितीचे नेते धरेप्पा कट्टीमनी यांनी दिली.या परिषदेसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम प्रमुख उपस्थित राहणार असल्याचेही कट्टीमनी म्हणाले.

या शिक्षण परिषदेत प्राथमिक शिक्षकांची जूनी पेन्शन, जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या, शिक्षण सेवकांचे मानधन,आश्वासित प्रगती योजना, बीएलओसह अन्य, अशैक्षणिक कामातून मुक्तता,पदोन्नती,शाळांना मोफत वीज, कॅशलेस सुविधा, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे यासह प्राथमिक शिक्षकांच्या विविध 'प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. या शिक्षण परिषदेत शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.तसेच इंद्रजीत देशमुख यांचे शिक्षण व्यवस्थेची सद्यस्थिती व संघटनांची भूमिका"या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून प्रचंड संख्येने शिक्षक उपस्थित राहणार आहेत, तरी सर्व प्राथमिक शिक्षकांनी या परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री.कट्टीमनी यांनी केले.




 


Blogger द्वारे प्रायोजित.