Header Ads

| जत | नगरपरिषदेचा 19 लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर


 
 

जत नगरपरिषदेचा 19 लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर

 

 

28 कोटी 33 लाख येणार, 28 कोटी 14 लाख खर्च होणार

 

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेकडून सन 2020-21 वर्षासाठीचा 19 लाख शिलकीचा अर्थसंकल्प शुक्रवारी विशेष सभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात महसूल व भांडवली जमा 28 कोटी 33 लाख रुपये, तर 28 कोटी 14 लाख इतका अपेक्षित खर्च निश्चित करण्यात आला आहे.या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही.अर्थ संकल्पात चौदाव्या वित्त आयोगातून आठ कोटी, यातच घनकचरा व्यवस्थापनासाठी 2 कोटी 47 लाखांचा निधी अपेक्षित आहे. नवीन इमारत व मुख्याधिकारी निवास 2 कोटी 50 लाख तरतूद करण्यात आली आहे. कर्मचारी गौरव म्हणून 5 लाखांची तरतूद केली आहे. दिव्यांग व आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे तसेच नागरिकांच्या सोईसाठी ऑनलाईन उतारे देण्यासाठी साॅप्ट वेअर डेवलप करणे, ई-गर्व्हनर सुविधा राबविणे,भाडे तत्त्वावर चालणारा जेसीबी बंद करून नवीन घेण्यात यावा, यासह विविध विषयांचा ठराव घेण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, मुख्याधिकारी अभिजीत हराळे, पाणी पुरवठा सभापती वनिता साळे, स्वच्छता व आरोग्य सभापती बाळाबाई मळगे, शिक्षण सभापती संतोष उर्फ भुपेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी माळी, ज्येष्ठ नगरसेवक इकबाल गवंडी, स्वप्निल शिंदे, नामदेव काळे, लक्ष्मण ऐडके, गायत्रीदेवी शिंदे, संतोष कोळी, इराण्णा निडोणी, उमेश सावंत, जयश्री मोटे, प्रकाश माने, जयश्री सगरे, आदीसह नगरसेवक उपस्थित होते.
 

 

फोटो वापरा
 


Blogger द्वारे प्रायोजित.