Header Ads

गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाच्या गजरात श्रीसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात


 
 

जत मध्ये श्रीसंत गाडगेबाबाची जयंती साजरी 

     

जत,प्रतिनिधी : जत शहर परीट समाज यांच्यावतीने राष्ट्रसंत श्री.गाडगे बाबांची 144 वी जयंती बंकेश्वर मंदिर येथे साजरी करण्यात आल.

समाजातील मान्यवरांच्या हस्ते श्री.गाडगेबाबच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले.देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा,माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर,सेवा करण्यात धन्यता मानणारे,संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर वक्ते बन्सीलाल कदम (सांगली)यांनी मार्गदर्शन केले.

समाजातील विशेष कार्य केलेल्या बांधवाचा सत्कार समारंभ तसेच "घरोघरी संत गाडगेबाबा"अभियान प्रारंभ करण्यात आला.संत गाडगेबाबाचे पुस्तक प्रतिमा भेट देण्यात आल्या.

समाजाची जनगणना करुन तालुक्यातील प्रत्येक घरोघरी संत गाडगेबाबांचे विचार पोहचवने हा उद्देश माडण्यात आला. तसेच महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा उपाध्यक्ष विलास गायकवाड,संजय साळुंखे,अशोक भंडारे,राजेंद्र साळुंखे,गजानन चव्हाण,आण्णाप्पा कोरे तसेच जत शहरातील व तालुक्यातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीनी समाज प्रबोधन केले.

 

 

जत येथे परीट समाजाच्या वतीने श्रीसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.