Header Ads

बालगावात मटका अड्ड्यावर छापा एकाला अटक : 46 हजारांचा मद्देमाल जप्त

बालगावात मटका अड्ड्यावर छापा
एकाला अटक : 46 हजारांचा मद्देमाल जप्तउमदी,वार्ताहर : सांगलीच्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून बालगाव (ता. जत) येथे अवैधरित्या मटका लिहून घेत असताना हणमंत भीमराव पाटील याला रंगेहाथ पकडले. या विरोधातील कारवाईत त्याच्याकडून मटका साहित्यासह 46 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालगाव येथील बसस्थानक परिसरातील हॉटेलसमोरच्या बाजूला हणमंत पाटील हा मटका लिहून घेत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना
मिळाली होती. त्यानुसार सांगलीच्या विशेष
पोलीस पथकाने छापा टाकून मटका साहित्य व एक मोटारसायकल असा एकूण 46 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी संशयित हणमंत पाटील यांच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.