Header Ads

उमदी परिसरात शिवजंयती उत्साहात साजरी


बालगांव,वार्ताहर : उमदी (ता.जत) येथे विविध सामाजिक संघटना कडून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उमदी येथील ग्रामदैवत श्री मलकारसिद्ध देवाचे पुजारी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.उमदी बसस्थानक परिसरात शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने दुध वाटप करण्यात आले. प्रा. सुनील नष्टे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

प्रा.नष्टे म्हणाले की,आई बापाला वृद्धाश्रमात ठेवणारा समाज व घराच्या शेजारीच असलेल्या भावाशी वर्षानुवर्षं न बोलणाऱ्या समाजाने आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत त्यांचे विचार अंगिकारले पाहीजेत. तसेच प्रत्येक घरात शिवचरित्राचे एक तरी पान दिवसातून प्रत्येकाने वाचलं पाहिजे तरच त्यांच्या विचाराचे पाळेमुळे आज समाजात रूजली जातील. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जोपासण्यासाठी प्रत्येकाने आपल्या समाजात वावरणार्‍या माता-भगीनीचा आदर केला पाहिजे असे ते म्हणाले.

अँड.चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत ते कोणत्या एका जातीधर्मासाठी सीमित नाहीत. फक्त जयंती करून उपयोग नाही तर शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपणाला सर्व समाज एकजूट करून समाज विकासासाठी काम करावे लागेल असेही ते म्हणाले.  एपीआय दत्तात्रय कोळेकर, युवानेते निवृत्ती शिंदे,उपसरपंच रमेश हळके,सुरेश कुळोळ्ळी, अनिल शिंदे,फिरोज मुल्ला, श्री.जाधव, राजू शिंदे,बंडा शेवाळे,तानाजी मोरे,रोहन चव्हाण,रवी शिवपुरे, राजु धोत्री,प्रा.गणेश शेवाळे,ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे, ग्राम विकास अधिकारी कुशाबा नरळे,नारायण ऐवळे, नामदेव सातपुते, संगु ममदापुरे,पिराप्पा माळी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

 

उमदी ता.जत येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

Blogger द्वारे प्रायोजित.