Header Ads

श्रीसंत बागडेबाबा अपघात 'मदत मानव मित्र' नेमणार 


 श्रीसंत बागडेबाबा अपघात 'मदत मानव मित्र' नेमणार 

 

हभप तुकाराम महाराज यांचा नवा उपक्रम


 

जत,प्रतिनिधी : दुर्देवाने अपघात घडल्यास, हृदयविकाराचा झटका आल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळत नसल्याने प्राणाला मुकावे लागते. यावर उपाय म्हणून गावोगावी "श्रीसंत बागडे बाबा अपघात मदत मानव मित्रांची" नियुक्ती केली जाणार आहे. मानव मित्राला वैयक्तिक विमा,ओळखपत्र, ड्रेसकोड व हेलमिट दिले जाणार आहे.याबाबत काम करण्यासाठी आवड असणा-या व्यक्तीनी संर्पक साधावा.असे आवाहन गोंधळेवाडी (ता जत) श्रीसंत बागडेबाबा भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार बैठकीत केले.

ते पुढे म्हणाले, राज्यात माजी ग्रामविकास मंत्री स्व.आर आर पाटील यांनी गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले.गाडगेबाबा व श्रीसंत बागडेबाबा यांची भेट झाली होती.दोघांचे विचार व सामाजिक प्रबोधन हे कार्य होते.बागडेबाबा यांनीही सामाजिक प्रबोधनाचे काम केले होते.त्यांच्याच कार्याचा वसा घेऊन तुकारामबा यांनी सामाजिक कार्य हाती घेतलेले आहे.लवकरच चार रुग्णवाहीक सुरु करणार आहे.तात्काळ अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी प्रत्येक गावोगावी "श्रीसंत बागडेबाबा अपघात मदत मानव मित्र" नियुक्त करण्यात येणार आहे.अपघात मदत मानव मित्रास वैयक्तिक विमा,ओळखपत्र,ड्रेसकोड व ब्रॅडेड कंपनीचे हेल्मीट दिले जाणार आहे.मानव मित्राची नेमणूक करताना काही अटी बंधनकारक असणार आहेत.त्यामध्ये तो निर्व्यसनी असला पाहिजे.त्याच्याकडे स्वतःची दुचाकी असली पाहिजे.गाडी चालविण्याची लायसन असले पाहिजे.या कामाची आवड असली पाहिजे.हा उपक्रम सेवाभावी वृत्तीने राबविला जाणार आहे.  

 

     मानव मित्र हा उपक्रम तालुक्यात माणुसकी जागवणारी, एकमेकाला मदत करण्यासाठी तयार केलेला आहे.यासाठी सामाजिक कार्याची आवड असणा-या  कार्यकर्तानी गोंधळेवाडी येथील दत्ता सावळे यांच्याकडे नांवे नोंदवावीत. असे आवाहन हभप तुकारामबाबा यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्रीना लवकरच भेटणार 

 

आपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यासाठी जत तालुक्यात "श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र" हा उपक्रम गावोगावात राबविला जाणार आहे.हा उपक्रम राज्यभर राबवावा.यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे तुकारामबाबा यांनी सांगितले.


 


 

Blogger द्वारे प्रायोजित.