Header Ads

थंडवा देणारी यंत्रे जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन


 


थंडवा देणारी यंत्रे जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

जत,प्रतिनिधी : तीव्र उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होताना अनेकजण थंडवा मिळविण्यासाठी कुलर खरेदी करत आहेत पंरतू कुलर वापर करताना नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे उन्हापासून बचावासाठी घरी, दुकान, कार्यालय आदी सर्वच ठिकाणी कुलरचा वापर करण्यात येतो. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा फायदा होत असला तरी योग्य काळजी न घेतल्यास कुलर नुकसानदायकही ठरू शकतो. त्यामुळे दरवर्षी कुलरच्या माध्यमातून शॉक लागून दुर्घटना घडतात. यापासून थोडीशी काळजी घेतल्यास दूर राहता येते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे, असे आवाहन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे.कुलरसाठी नेहमी थ्री पीन प्लगचा वापर करावा, फेजवायर स्विच म्हणून न टाकल्यामुळे स्विच ऑफ केला तरी लाईव्ह वायरचा परिणाम कुलरच्या बॉडीमध्ये येतो. कुलरमध्ये पाणी असल्यामुळे ईलेक्ट्रीक सर्किट होवून कुलरच्या लोखंडी बॉडीत करंट येवून त्याला शरीराचा स्पर्श झाल्यास विजेचा जबर धक्का बसतो. स्विचमधील लाईव्ह वायर, फेजवायरमधील तार कुलरच्या बॉडीला चुकून लागल्यास लिकेच करंट येवून धक्का बसतो. शरीराचा प्रतिरोध कमी होतो व जास्त प्रवाह शरीरातून जावून जोराचा शॉक बसतो. कुलरच्या टाकीमध्ये पाणी भरताना नेहमी प्लग पीन काढून ठेवावी म्हणजे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरल्यानंतर प्लग पीन लावून स्विच चालू करावा. त्यानंतर कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये. कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिगची तपासणी करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये. कुलरमध्ये पाणी भरताना टाकीच्या खाली घसरून ते पाणी बाजूला जमिनीवर फैलणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुलांना कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. ते कुलरच्या जवळ खेळणार नाही, याची काळजी घ्यावी. कुलरचा जमिनीशी संपर्क असावा अशी काळजी घ्यावी. आतील वायर पाण्यात डुबणार नाही हे बघावे, पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कुलरला हात लावावा, कुलरमधील माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये, कुलर दुरुस्ती करताना प्लग काढून ठेवावा, प्लगला जोडलेली वायर खंडित किंवा जीर्ण झाली असल्यास ती बदलवून टाकावी, कुलर हलविताना प्लग पीन काढून नंतरच हलवावे. कुलरपंप मध्ये-मध्ये बंद करावा, घरामध्ये अर्थलिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. 
अशा प्रकारे कुलरचा वापर करताना काही नियम पाळल्यास व काही बाबी टाळल्यास या तापमानामध्ये कुलरचा गारवा सुरक्षितपणे अनुभवता येवू शकतो, असे महावितरणचेे अभिंयता श्री.राठोड यांनी कळविले आहे. 


Blogger द्वारे प्रायोजित.