Header Ads

चांगल्या आरोग्यासाठी जूने उपाय वापरण्याची गरज ; आ.विक्रमसिंह सांवत | मेंढीगिरीत आरोग्य शिबिर संपन्न 


 चांगल्या आरोग्यासाठी जूने उपाय वापरण्याची गरज
 

आ.विक्रमसिंह सांवत : मेंढीगिरीत आरोग्य शिबिर संपन्न

 

जत,प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या जिवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत.सदृढ  आजी-आजोबाच्या पारपांरिक उपायाचा शरिरासाठी उपयोग करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.   मेंढीगिरी ता.जत येथे ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोग योजने अंतर्गत आयोजित आरोग्य शिबीरात बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सावंत यांच्याहस्ते झाले.यावेळी तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार,सरपंच प्रकाश पाटील,उपसरपंच सुरेश व्हनवाडे,माजी सरपंच सुभाष बिराजदार,माजी उपसरपंच सौ.श्रीदेवी कट्टीमणी,माजी उपसरपंच बसू रोट्टी,माजी चेअरमन उमार जैन,विजय कुरळे,पत्रकार राजू ऐवळे,श्रीशैल शेगुणशी,डॉ.संजय सावंत,सुरेश कांबळे,माजी चे.शिदगोंडा बिरादार उपस्थित होते.यावेळी गावातील नागरिक व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.आमदार सांवत पुढे म्हणाले,45 वयापर्यत आपण सदृढ असतो.मात्र 45 वयानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला आजाराची जाणीव व्हायला लागते.त्यामुळे अशा आजारावरील जुने उपाय पुन्हा वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.शेणकुटाच्या राखेची दात घासण्यासाठी पुर्वजाचा उपयोग आजही न खिडता दात असणाऱ्या नागरिकांत दिसून येत आहे.त्यामुळे आजच्या गतीमान जिवनचक्रात ते पुन्हा वापरण्याची वेळ आली आहे.तरच आपण विना आजाराचे राहू शकतो.पटकन बरे होण्याच्या घातक औषधाचा वापर थांबविण्याची गरज आहे.

 

मेंढीगिरी ता.जत येथे आरोग्य शिबिर उद्घाटन करताना आ.विक्रमसिंह सांवत,आप्पाराया बिराजदार
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.