Header Ads

खरीप पीक नुकसानीचा विमा द्या : संजय तेली


 

उमदी,वार्ताहर : जत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना 2019-20 चा खरीप पीक नुकसानीचा विमा तत्काळ मिळावा अन्यथा विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे उमदी जिल्हा परिषदेचे गटाचे नेते संजय तेली यांनी दिला.

या संदर्भातील निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जतमध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे खरीप पिकाचे नुकसान झालेले आहे.अद्यापही ल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळालेली नाही. यामध्ये कपाशी, बाजरी, सोयाबीन तसेच द्राक्ष, डाळिंब या फळवार्गाचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे बोर नदीकाठचा शेतकरी पूर्णपणे भरडला गेला आहे. त्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीचे तसेच खरीप पिकांचे पंचनामे होऊनहीं पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.