मराठा पतसंस्थेच्या चेअरमन गणेश सावंत,व्हा.चेअरमन श्रीकृष्ण पाटील यांची फेरनिवड 

जत,प्रतिनिधी : मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जतच्या चेअरमनपदी गणेश सांवत तर व्हाईस चेअरमनपदी श्रीकृष्ण पाटील यांची

निवड झाली.नुकतीच संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सल्लागार बाळासाहेब जाधव हे होते.

या वेळी संस्थेचे संचालक शैलेंद्र शिर्के,  सौ.गिता सावंत,सौ.मंदाकिनी मानेपाटील ,सागर सोनार,अतुल मोरे,सुजय उर्फ नाना शिंदे,मिलिंद ऐनापूरे,संतोष जाधव,सचिव अनिल गंगणे आदी उपस्थित होते.यावेळी संचालक सुजय उर्फ नाना शिंदे यांनी चेअरमन,व्हाय.चेअरमनची नावे सुचविली.सर्वांनी त्यास सम्मती दिली.निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

 

मराठा पतसंस्थेच्या चेअरमनपदी गणेश सांवत व व्हा.चेअरमनपदी श्रीकृष्ण पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.