Header Ads

जतच्या सिंचन योजना पुर्ण होणार | राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा | मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन

 


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सिंचन योजना शंभर टक्के पुर्ण करून संपुर्ण तालुका पाणीमय होणार हे निश्चित आहे.आमचे नेेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे काम पुर्ण केल्याशिवाय स्वस्थ  बसणार नाहीत,त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू अशी माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली.तालुकाध्यक्ष अँड.बसवराज धोडमणी,ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे,चन्नाप्पा होर्तीकर,रमेश पाटील, सिध्दूमामा शिरसाड,मन्सूर खतीब,जे.के.माळी, शिवाजी

शिंदे,आप्पा पवार,युवकचे अध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण,पवन कोळी, अशोक

कोळी,हेमंत खाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.सुदैवाने या जिल्ह्याचे नेते जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभागाचे खाते असल्याने जतसह दुष्काळी भागाच्या पाण्याच्या बाबतीत अपेक्षा उंचावल्या आहेत.जत तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी मंत्री पाटील अग्रही आहेत.त्यासाठी लवकरच पाणी परिषदेचे आयोजन करण्यात येणार यावेळी सांगितले.

तालुकाध्यक्ष अँड.धोडमणी म्हणाले, जत तालुका सातत्याने दुष्काळाचे चटके सोसत आहे. पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे आता या तालुक्याला केवळ सिंचनाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आल्याशिवाय आता पर्याय नाही. यादृष्टीने जत तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाने या एकाच विषयावर काम करण्याचे धोरण हाती घेतले आहे. जतच्या पाणीप्रश्न सोडवण्याची ग्वाही आमचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.म्हैसाळ योजनेच्या कामाबरोबर तालुक्यातील सिंचन योजनेतून पाणी पोहचविण्यासाठीचे नियोजन सुरू आहे.

पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीने तालुक्यातील गावनिहाय बैठका आणि जनजागृती करण्यात येणार आहे. या परिषदेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित रहाणार आहेत,असेही धोडमणी म्हणाले.

चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले,जतवर मंत्री पाटील यांचे वडिल स्व: राजारामबापूंनी कायम प्रेम केले आहे. दुष्काळी तालुक्याचा विकास झाला पाहिजे यासाठी सातत्याने त्यांनी लढा उभारला.त्यांच्या काळात जतच्या शेवटच्या टोकापर्यत विज पोहचली.त्यांच्या त्याचे चिरजिंव मंत्री जयंत पाटील जतसाठी कायम अग्रही राहिले आहेत. तालुक्याला रस्ते, ग्रामसुधारणा,आघाडी सरकार काळात तलाव यासाठी भरीव निधी दिला होता.


दुर्दैवाने मागच्या पाच वर्षात राज्यातली सत्ता गेली, त्यामुळे पूर्व भागातील वंचित

गावांचा पाणीप्रश्न प्रलंबीत राहीला. परंतु आता पाणी देणारे आणि योजना मार्गी

लावणारे खातेच त्यांच्याकडे असल्याने जत तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येईल.त्यामुळे पाटील यांच्यावर कोण टीका करत असेल तर त्यांच्या

वक्तव्याची दखल घेण्याची गरज आंम्हाला वाटत नाही.त्यांच्या मार्गदर्शनाखाली जतचा नव्याने सर्वे करून तालूक्यातील शेवटच्या शेतकऱ्यां पर्यंत पाणी पोहचवण्याचे काम होणार आहे.जत तालुक्यातील राष्ट्रवादी एकसंघपणे या कामात अग्रभागी राहून काम करणार आहे.


उत्तमशेठ चव्हाण म्हणाले, जत तालुक्यात पाणी आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जयंत पाटील यांनी पहील्याच सभेत जतच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचा शब्द दिला आहे.त्यांच्या टिका करणे चुकीचे आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.