Header Ads

वजनमापातून ग्राहकांची लूट

जत,वार्ताहर : महागाईने सर्वत्र कहर केला. तेलाच्या थेंबापासून तर धान्याच्या दाण्यापर्यंत अगदी सर्वच बाबतीत काटेकोर पैसे घेतले जाते. मात्र, वजनात फरक आढळून येत असल्याने ग्राहकांची लूट होत असल्याची चर्चा आहे. याकडे वजनमापे तपासणी अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते. 
जत तालुक्यात वजनमापे तपासणी अधिकार्‍यांकडून तोल काटे, मापे, इलेक्ट्रॉनिक काटे तपासण्याची कामे केली जातात. तरीसुद्धा ग्राहकांचे समाधान होत नाही. घेतलेल्या वस्तू मोजमापात कमी येत असल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. कापूस, मिरचीपासून धान्यापर्यंत तेल-तुपापर्यंत आर्थिक नुकसान सहन करावे लागते.एकच वस्तू दोन-तीन इलेक्ट्रॉनिक तोलकाट्यावर मोजली असता कमी-जास्त आढळून येत असल्यामुळे ग्राहकांना नुकसान सहन करावा लागते. पेट्रोल डिझेल पंपावरसुद्धा 30 ते 45 पैशाचे इंधन कमी येते. 

   

 
Blogger द्वारे प्रायोजित.