Header Ads

दारू गुत्ते फोफावले | आशिर्वाद कोणाचा | लहान मुलेही नशेच्या आहारी,माणसे मरण पावली : 


 

 

जत,(का.प्रतिनिधी):जत उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने जत शहरासह पुर्ण तालुक्यातील अनेक गावात अवैध दारु विक्रेत्यांनी थैमान घातला असून जागोजागी दारूची अवैध विक्री शाळा परिसर, सार्वजनिक ठिकाणी जोमात चालू आसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत मात्र येथील कार्यरत दारुबंदी निरीक्षक, बीट जमादार हा सर्व प्रकार उघड्या डोळयांनी पाहत मुकसमंती दर्शविल्याची चर्चा आहे त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे मनोबल वाढले आहे.याठिकाणचे अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने अवैध दारूविक्रेत्यांना कोण आवर घालणार असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. 
जत तालुक्यात अवैध दारू विक्रीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असुन अनेकजण या दारूच्या नादी लागून आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत तर सर्वात गंभीर बाब म्हणजे शालेय विद्यार्थीही दारूच्या नादी लागल्याचे ऐकावयास मिळाले आहे.शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची दुकाने थाटल्याची दिसत आहे दारूबंदी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आहेत ते नावालाच असून आपल्या सवडीनुसार भेटी देवून वर्षभरात उदिष्टपुर्तीचे टारगेट पुर्ण करण्यासाठी कार्यवाही करतात तर पोलिस प्रशासनाचीही अशीच भुमिका आहे.मात्र अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी कुठलीच कडक भूमिका घेवून लगाम लावला जात नसल्याने जागरुक महिला, पुरुषामध्ये दोन्ही विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. 
शाळा,बसस्थानकाशेजारी अवैध दारु विक्री गुत्ते;
जत तालुक्यातील अनेक गावातील शाळा परिसर,बसस्थानक व सार्वजनिक ठिकाणी शासनमान्य बार आसतानाही अवैधरित्या देशी आणि विदेशी दारुची अवैधरित्या खुलेआम विक्री केल्या जात आहे ड्राय डेच्या दिवशीही खुलेआम उघड्यावरच दारूच्या बाटल्या ठेवत जादा दराने दारूची विक्री करत आसल्याचे अनेक गावातील चित्र आहे,अुन बंद च्या दिवशी अनेकदा याठिकाणी वाद निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत याबाबत पोलिस प्रशासनास सांगून ही काहीच उपयोग होत नसल्याच्या तक्रारी आहेत कायद्याची पायमल्ली करीत खुलेआम अवैध दारू विकणारा कोण आहे त्याचा शोध घेण्यास याठिकाणच्या संबंधितांंना वेळ नाही त्यामुळे वरिष्ठानीच त्याचा शोध घेवुन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. 
पुर्व भाग अवैध दारूच्या विळख्यात;
तालुक्यातील पुर्व भागातील जवळपास सर्वच गावात अवैध दारु व्यवसायाच्या विळख्यात अडकल्याची ओरड जागरुक ग्रामस्थातून होत असून पोलीस, उत्पादन शुल्क अधिकारी यांनी जणू या धंद्याला पाठींबा दिला की काय असा समज येथील सर्वसामान्यांना पडतो आहे.अनेक रस्त्यावर आसलेल्या ढाबे,हॉटेलवरूनही अवैध रित्या दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम चालतो आहे. मुख्य रस्त्यावरील हाँटेल मधून देशी व विदेशी दारू विक्री होत आहे. यामुळे ग्रामस्थाना दारू विक्रीचा व तळीरामचा त्रास सहन करावा लागत आहे.पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क यांच्या छुप्या पाठिंब्याला गावातील राजकीय पुढारी ही साथ देत असल्याचे दिसत आहे. चहा पेक्षा दारूच्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. आता वरीष्ठानी लक्ष देण्याची गरज 
शहरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये अवैध दारूविक्रीचा व्यवसाय चांगलाच फोफावत आसतानाच उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी ,कर्मचारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आसल्याचे दिसत आहे तक्रारी होताच नाममात्र कार्यवाहीचा देखावा केला जातो मात्र ठोस कार्यवाही होत नाही त्यामुळे वरीष्ठानीच या अवैध धंद्याकडे लक्ष देवुन ते कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केली जात आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.