Header Ads

उटगीतील शुशोभिकरणाने गावाला सुंदरतेची झालर


 

माडग्याळ, वार्ताहर : ऐतिहासिक महत्व असलेल्या उटगी ग्रामपंचायतीने विकासाची कास धरली आहे.गावातील अतर्गंत सुंदरतेला महत्व दिले जात आहे.शासनच्या विविध निधीतून स्वागत कमान,ग्रामपंचायत कार्यालय व परिसराचे शुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याशिवाय गावातील अतर्गंत रस्ते,चौक सुंदर करण्याचे काम सुरू आहे.तसेच 


गावात प्रवेश करण्याच्या ठिकाणी स्वागत कमानीचे शुशोभिकरण,रंगरगोटी करण्यात आली आहे. त्याशिवाय ग्रामपंचायती इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायती समोरील परिसराला वेगवेगळ्या पध्दतीने सजविण्यात येत आहे. गावाच्या विकासाचे पदाधिकाऱ्याचे धोरण गावाला प्रगतीपथावर आणणारे ठरणार आहे.

 

 

उटगीतील स्वागत कमान लक्षवेधी परत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.