Header Ads

| अथणी | कर्नाटकातील ऐगळी- अथणी रस्त्यावर अचकनहळ्ळीचा एकजण ठार


 
जत,प्रतिनिधी : कर्नाटकातील ऐगळी- अथणी रस्त्यावर दुधाच्या पिक -अप गाडीला अपघात होऊन जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथील शिवाजी मोहिते (वय 45) हे जागीच ठार झाले.हा अपघात मंगळवारी दुपारी घडला.

मोहिते यांची दूध वाहतूक करण्यासाठी पिक अप गाडी आहे.कर्नाटक येथून दूध गोळा करून ते दूध संस्थेकडे पाठवितात. सोमवारी ते दुध गोळा करण्यासाठी ऐगळी-अथणी रस्त्यावर गाडी चालवित असताना त्यांना चक्कर आल्याने गाडीला अपघात होऊन गाडी ड्रायव्हरच्या बाजूने पलटी झाल्याने ते गाडीखाली सापडून जागीच मयत झाले. यामुळे

अचकनहळ्ळी गावावर शोककळा पसरली आहे. जत तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष रामराव मोहिते यांचे ते बंधू होत.
 


Blogger द्वारे प्रायोजित.