| शेड्याळ | येथे विद्युत तार तुटून द्राक्ष बाग जळाली
जत,(प्रतिनिधी): जत तालुक्यातील शेड्याळ येथे विद्युत तार तुटून गौतम मोटे यांच्या शेतातील द्राक्षबाग जळून दीड लाखाच्यावर नुकसान झाले आहे. मोटे यांच्या शेतावरून पवनचक्कीने विद्युत वाहिन्या ओढल्या आहेत. या वाहिनीतून वीज मंडळ यांना वीज दिली आहे. काल या वाहिनीची तार तुटून मोटे यांची द्राक्ष बाग जळाली आहे. बागेत मणी तयार झाले होते. व ही बाग आठवड्यात विक्रीसाठी जाणार होती. त्यापूर्वीच बागेचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे मोटे हे हतबल झाले आहेत. पवनचक्कीकडे की विद्युत कंपनीकडे दाद मागायची या विवंचनेत आहेत.