Header Ads

| शेड्याळ | येथे एकाला मारहाण; गुन्हा दाखल

शेड्याळ येथे एकाला मारहाण; गुन्हा दाखल

 

जत,प्रतिनिधी : शेड्याळ (ता. जत) येथे शेतातील जुन्या वादावरून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश बाळाप्पा गुगवाड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबतची गोपाळ लिंगाप्पा सोरडी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोपाळ व सुरेश यांच्यात अनेक वर्षापासून शेतजमिनीवरून वाद आहे.21 फेब्रुवारी रोजी सुरेश याने गोपाळ याला कुऱ्हाडीने मारहाण केली.

 

Blogger द्वारे प्रायोजित.