Header Ads

| जत | जत तालुक्यातील रस्त्यासाठी विशेष निधी मिळणार 


 जत तालुक्यातील रस्त्यासाठी विशेष निधी मिळणार
 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाकडून विशेष निधी देऊ,असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.अधिवेशन काळात आ.सांवत यांनी जत तालुक्यातील रस्त्यांना विशेष निधी देऊन सर्व रस्ते डांबरीकरणाने मजबूत करावेत अशा मागणीचे निवेदन  दिल्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.

जत तालुक्यात प्रमुख राज्यमार्गासह तालुका अतर्गंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे.अनेक रस्ते अद्याप डांबरीकरणा पासून वचिंत आहे.त्याशिवाय रस्ते खराब झाल्याने दळणवळणावर मोठा परिणाम होत आहे.

त्यामुळे हे रस्ते मजबूत करण्यासाठी विशेष निधी देण्याची गरज असल्याचे सांवत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पटवून सांगितले. अनेक रस्त्याची माहितीही त्यांना दिली.

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना जत तालुक्यातील रस्त्यांची माहिती देताना आमदार विक्रमसिंह सांवत
 


Blogger द्वारे प्रायोजित.