Header Ads

| मेंढेगिरी | जि.प.कन्नड शाळेस आ.विक्रमसिंह सावंत यांची सदिच्छा भेट


 




मेंढेगिरी जि.प.कन्नड शाळेस आ.विक्रमसिंह सावंत यांची सदिच्छा भेट

 

बालगांव,वार्ताहर : मेंढेगिरी ता.जत येथे ग्रामपंचायत वतीने आयोजित महाआरोग्य शिबीर दरम्यान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जि.प.कन्नड शाळेस भेट दिलीे.यावेळी तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार हे उपस्थित होते.

 मुख्याध्यापक विठ्ठल चन्नाप्पा मुचंडी  यांनी लोकसहभागातून शाळा विकास कसे साधले याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच चालू 2019-20 शैक्षणिक  वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत "स्वच्छ सुंदर आदर्श शाळा पुरस्कारासाठी" मेंढेगिरी कन्नड शाळेची निवड झाल्याचेही सांगितले.

आ.सांवत यांनी शाळेचा स्वच्छ सुंदर आरोग्यदायक परिसर ,शाळेतील आधुनिक शैक्षणीक सुविधा व विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था,शालेय निसर्गरम्य परिसर , वृक्षसंवर्धन,शैक्षणिक गुणवत्ता  निटनेटकेपणा आदी बाबींची निरीक्षण केले.शाळेची लोकसहभागातून व ग्रामपंचायत मार्फत झालेला शाळेचा विकास,जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाले बद्दल कौतुक व्यक्त केले.

शाळेच्या विकासात सतत प्रयत्नशील राहणारे  शिक्षक, शाळा समिती,ग्रामपंचायत पालक व विद्यार्थी वर्ग यांचाही कौतुक केले व शाळेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शाळेसाठी पटसंख्येनुसार 2 वर्गखोली व 2 शिक्षक कमी ते मिळावेत अशी मागणी सरपंच प्रकाश पाटील यांनी केली.आ.सांवत यांनी दोन्ही मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.

 माजी सरपंच सुभाष बिरादार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदिनाथ जैन,सोसायटीचे चेअरमन कुमार जैन,दुंडाप्पा घटनट्टी,पत्रकार राजू ऐवळे, प्रकाश शेगुणशी,श्रीशैल शेगुणशी,बसगोंडा बिरादार,रणजित कांबळे,सुरेश व्हानवाडे,सुरेश कांबळे,रावसाहेब रोट्टी सहशिक्षिका श्रीमती सविता बिरादार व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

मेंढीगिरी ता.जत येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत आ.विक्रमसिंह सांवत यांचा सत्कार करताना संरपच प्रकाश पाटील व मान्यवर




 



 






 





Blogger द्वारे प्रायोजित.