Header Ads

कोसारीत बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लंपास


जत,प्रतिनिधी : कोसारी (ता.जत) येथील पांडूरंग ज्ञानू अलदर (वय 62) यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील एक लाख 64 हजार किमतीचे दागिने चोरून नेले.मंगळवारी दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात पांडूरंग अलदर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी ढालगाव येथे अपघात होऊन जखमी झालेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी अलदर सह कुटुंब गेले होते. घराला कुलूप लावले होते. ढालगाव येथून परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. मात्र, याची चौकशी केली. चोरीचा थांगपत्ता लागत नसल्याने त्यांनी आज शनिवारी दि. 21 फेब्रुवारी रोजी जत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहिते करत आहेत.
 


Blogger द्वारे प्रायोजित.