जत तालुक्यातील शिक्षकांना टॅक्समध्ये सवलत द्या : दिलीप हिदुस्थांनी
जत तालुक्यातील शिक्षकांना टॅक्समध्ये सवलत द्या
बालगांव,वार्ताहर: जत तालुक्यातील शिक्षकांना टँक्समध्ये सवलत द्यावी अशी मागणी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीपकुमार हिंदुस्थानी यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जत यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सन 2019/20 चे कर भरण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.इतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या कपातीप्रमाणे टॅक्स कपात करावी.आयकर सवलतीअंतर्गत घरबांधणी, घरभाडे,शिक्षण फी,अपंग सवलत आदी बाबी ची सूट वजाती उर्वरित करपात्र रक्कम रक्कम घेणे आवश्यक असताना कार्यालयाकडून सक्तीने एकूण पगाराच्या उत्पन्नावरील कर रक्कम शिक्षकांच्या पगारातून कट केला जातो. सवलतीचा लाभ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रक्कम अनावश्यक रक्कम पगारातून घेतली जात आहे.त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.टॅक्स सुटची सवलत न दिल्यामुळे शिक्षकांत नाराजी आहे.त्यामुळे फक्त करपात्र आयकर रक्कम कपात करण्यात यावी.

जादा रक्कम पगारातून घेतल्याने रिफंडसाठी शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होणार आहे.त्यामुळे कर भरण्याची जबाबदारी शिक्षक कर्मचारी यांची आहे.कर्मचाऱ्यांने दिलेल्या कपातीप्रमाणे आयकर कपात घालावी. अशी मागणी हिंदुस्थानी यांनी केली आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष संतोष काटे,पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाले, जिल्हा उपाध्यक्ष मलेशप्पा कांबळे,तालुकाध्यक्ष-सुनिल सुर्यवंशी आदी उपस्थित होते.