Header Ads

संख येथे महिला ग्रा.प.सदस्यासाठीच्या क्रांतीज्योती प्रशिक्षणास उत्स्फुर्त प्रतिसाद 





जत,प्रतिनिधी : संख ता.जत बीट मधील महिला ग्रामपंचायत सदस्यासाठी पंचायत राज व्यवस्थेतील महिला कारभारणीची जबाबदारी,जाणीव,जागृत्तीसाठी संयुक्त प्रशिक्षण केंद्र मौनी विद्यापीठ गारगोटी,जि.कोल्हापूर यांच्यावतीने ग्रा.पं.सभागृह संख येथे तीन दिवसीय परिसंवादास प्रांरभ झाला.संखच्या संरपच सौ.मंगल पाटील यांच्याहस्ते शुभारंभ झाला.प्रशिक्षणास उपसंरपच सदाशिव दर्गाकर, ग्रामसेवक के.डी.नरळे सह परिसरातील सुमारे 50 महिला सदस्या उपस्थित होत्या.ग्रा.पं.कारभार,73 वी घटना दुरूस्ती,महिला सदस्यांच्या जबाबदाऱ्या,ग्रामविकासाच्या विविध योजना,14 वा,15 व्या वित्त आयोग निधीतील कामाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.1 ते 33 नमुणे,ग्रामपंचायत अधिनियम 1958 महत्वाच्या तरतूदी,ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालवायचा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती मनोज जगताप,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी भेट दिली.

 

संख बीट मधील महिला ग्रा.प.सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रंसगी संरपच मंगल पाटील,बाजूस उपसंरपच सदाशिव दर्गाकर,ग्रामसेवक के.डी.नरळे


 

 



 

Blogger द्वारे प्रायोजित.