Header Ads

बसस्टँड परिसरात दुर्गंधी | स्वच्छता गृहाचे सांडपाणी रस्त्यावर | प्रवाशाचे आरोग्य धोक्यात,रिपाइचा आंदोलनाचा इशारा







 

 

जत,प्रतिनिधी : जत एसटी स्टँडच्या स्वच्छता गृहाचे दुर्गंधी युक्त सांडपाणी तब्बल महिनाभरा पासूून थेट विजापूर-गुहागर महामार्गावरून वाहू लागल्याने बसस्थानकात दुर्गंधी पसरली आहे.प्रवाशांना नाकाला रूमाला लावून स्टँडमध्ये बसावे लागत आहे.लगचे व्यवसायिक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपरिषद,बसस्थानक प्र शासनाच्या दुर्लक्षाने प्रवाशी,लगतचे प्रवाशी,नागरिकांचे आरेग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.तातडीने गटारीचे हे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करावे,अन्यथा रिपाइच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिला आहे.



 

व्हिडिओ पहा..


 

जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गाचे काम चालू आहे.त्यात गटारीवर अतिक्रमणे झाल्याने रस्त्यालगतच्या गटारी तुंबल्या आहे.यामुळे जत बसस्थानकाच्या कार्यालयातील स्वच्छालय,व प्रवाशाचे स्वच्छता गृहाचे सांडपाणी गेल्या महिन्या भरापासून थेट रस्त्यावरून वाहू लागले आहे.त्यांची दुर्गंधी संपूर्ण स्टँडवर पसरली आहे.प्रवाशांना यामुळे नाकाला रूमाल लावून बसण्याची वेळ आली आहे. स्टँड परिसरातील हे सांडपाणी पुढे विजापूर-गुहागर रस्त्यावरून निवाशी गल्लीत जात आहे.त्याचा फटका स्टँडबाहेरील व्यवसायिकांना बसला आहे.दुर्गंधीमुळे त्यांच्या दुकांनाकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.निवासी गल्लीतील नागरिकही या दुर्गंधीने वैतागले आहे.स्वच्छता गृहाचे तीव्र दुर्गंधी 

असणाऱ्या या पाण्यामुळे आजारांना निमंत्रण देण्याचा प्रकार आहे.या प्रकाराला नगरपरिषद,बसस्थानक व्यवस्थापन,रस्ते प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तातडीने गटारी प्रवाहीत करावी अन्यथा सांडपाण्याची विल्हेवाट लावावी असा इशारा संजय कांबळे यांनी दिला आहे.

 

 

स्टँडबाहेर सांडण्याचा डोह

 

बसस्थानकाच्या इन गेटच्या लगत गटारीच्या डबक्यात हे पाणी थांबल्याने डोह तयार झाला आहे. तेथून पुढे  विजापूर-गुहागर महामार्गावरून पाणी वाहू लागले आहे.त्यांची दुर्गंधी परिसरात पसरली आहे.तब्बल महिन्यापासून ही स्थिती कायम आहे.



 

 




 

 


 



 



Blogger द्वारे प्रायोजित.