Header Ads

'आमदार आपल्या दारी' जनतेचे प्रश्न मार्गी लागतील | आ.विक्रमसिंह सांवत : उमदीतून सुरूवात

 उमदी,वार्ताहर :'आमदार आपल्या दारी' या कार्यक्रमाची सुरुवात जत तालुक्यातील उमदी पंचायत समिती गणातून उमदी येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या संकल्पनेतून करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटी,तहसीलदार सचिन पाटील व संखचे अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ उपस्थित होते.
शासनाच्या विविध खात्याच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्वसामान्य जनतेला याचा लाभ व्हावा म्हणून तालुक्यात पंचायत समिती गणात हा 'आमदार आपल्या दारी' या कार्यक्रमाची सुरुवात उमदी ता.जत पंचायत समिती गणातून करण्यात आली.
यावेळी आमदार सावंत म्हणाले की, शासनाच्या विविध योजना तळागाळा पर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जनतेने याचा फायदा घ्यावा. यावेळी महसूल,कृषी, महावितरण, वनविभाग, पशुसंवर्धन व पंचायत समिती मार्फत मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती संबंधित शाखाच्या अधिकार्‍यांनी लोकांना वाचून दाखवली. त्याचबरोबर शिक्षण व आरोग्य यांच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी याठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. आमदार विक्रम सावंत यांनी दिवसभर थांबून उपस्थित लोकांची कामे करून घेण्यासाठी मदत केली.तसेच संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने योजनांची माहिती लोकांना दिली.यामध्ये संजय गांधी पेन्शन योजना, रेशन कार्ड काढून देणे, विभक्त कुटुंब कार्ड, नावे लावणे, कमी करणे, सातबारा दुरुस्ती, पी एम किसान योजना, आठ अ चे उतारे, रोजगार हमी, घरकुल योजना या सर्व योजना त्याची कामेही यावेळी करण्यात आली.
यावेळी घरकुल, जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड, नवीन रेशन कार्ड, कृषि योजनेच्या ट्रॅक्टर वाटपही आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.अशा योजना प्रत्येक पंचायत समिती गणातून घेण्यात येणार आहेत. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले.यावेळी सरपंच वर्षा शिंदे,उपसरपंच रमेश हळके, युवा नेते निवृत्ती शिंदे,सरपंच राजु पाटील, मोहण सावंत, वहाब मुल्ला,बंडू शेवाळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धोत्री,ग्रा.प.सदस्य नामदेव सातपुते, यल्लापा तोरणे, संगु ममदापुरे, नारायण एवळे, पापडी मुन्ना सह सर्व ग्रामस्त उपस्थित होते.
 
 
उमदी ता.जत येथे आमदार आपल्या दारी योजनेअतर्गंत रेशकार्डचे वाटप करताना आमदार विक्रमसिंह सांवत,प्रंशात आवटे,सचिन पाटील
 

 
 


  


Blogger द्वारे प्रायोजित.