Header Ads

तालुकाभर अवैद्य धंद्याचा विळाखा | पोलीसाचा पांठिबा,हप्ते द्या काहीही कराचा फतवा ?


 जत,प्रतिनिधी: राज्यातील कायम दुष्काळी तालुका म्हणून असणाऱ्या जत तालुक्याचे दुष्काळ मुक्तीकडे आगेकूच होत आहे. अशा या तालुक्याला अवैध धंद्यांनी चांगलाच फास आवळला आहे. या व्यावसायिकांना राजकीय क्षेत्रातील मंडळीचे छुपा पाठिंबा आहे.त्याशिवाय जत,उमदी पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे तालुक्याचा इतिहास बदलत, तो गुन्हेगारीकडे झुकताना दिसत आहे. जत शहर तालुका आपली मक्तेदारी असल्यासारखे पोलिस,अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून अर्थपूर्ण गरजा भागवत आहे. मात्र, यामुळे अवैध व्यावसायिकांचे चांगलेच फावले. एखाद्या अधिकार्‍याने कर्तव्यनिष्ठेचा आव आणणारे काही अधिकारी, पोलीस व्यावसायिक साथ देताना दिसत आहेत.जत उमदी पोलीस,विशेष पथकांना दिल्या जाणाऱ्या हप्तेबाजीमुळे तालुक्यात अवैध धंदे बिनबोबाट सुरू आहेत.या धंद्यांना राजाश्रय देण्यासाठी पोलीस ठाण्याचे चार चार,विशेष पथकाचे विशेष वसूली कलेक्टर या मोहिमेवर लावल्याचे वास्तव आहे.यंत्रणेचा सामान्य नागरिक एज्युकेटेड क्राईमचा त्रास होताना दिसत आहे.आज वास्तविक पाहता तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेले दारू, मटका, जुगार अड्डे, अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. पोलिस, अवैध व्यावसायिक आणि त्यांच्या दलालांच्या लागेबांध्यामुळे अवैध धंदे बोकाळले आहेत. तालुक्यात जत,उमदी व विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय असतानाही अवैध धंद्यांचा फास आवळल्याचे दिसून येत आहे.तालुक्याच्या गावागावात खुलेआम अवैध गावठी दारू, मटका, जुगार अड्डे सुरू आहेत.त्याशिवाय वाळू तस्कर सुसाट आहेत.असे अवैद्य धंदे चालक व त्यांच्या पाठीशी असणाऱ्या राजकीय युवराजाचा वावर पोलिस ठाणे आवारात असतो.त्यामुळे त्यांच्या कारवाई होत नाही. परिणामी अशा धंद्यामुळे नागरीवस्तीत पुन्हा उपद्रव मूल्य वाढत आहे. स्थानिक पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असताना पोलिस कारवाईत कुचराई होत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. चरस, गांजा यांच्यासह विविध अंमली पदार्थाची येथे विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही स्थानिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तडजोडीमुळे गुंडांकडून स्थानिकांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. 
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे वेगवेगळे हप्ते ?
तालुक्यातील दोन्ही ठाण्यातील पोलीस अधिकारी यांचे या अवैध धंदे चालकांकडून मोठे हप्ते तर कर्मचाऱ्यांना छोट्या रक्कमेचे हप्ते पुरविले जात असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय विशेष पथकांचाही समावेश आहे.
 
ठिय्या मांडलेल्या कर्मचारी तडजोडीत ?
तालुक्यातील व अनेक वर्षापासून ठिय्या मांडलेल्या कर्मचाऱ्यांकडून या अवैध धंदे चालकांना मोठ्या आर्थिक तडजोडीतून राजाश्रय दिला जात असल्याची चर्चा आहे.असे कर्मचारी अनेक वर्षापासून तालुक्यात तळ ठोकून आहेत.


Blogger द्वारे प्रायोजित.