Header Ads

शेतकऱ्यांची मुलेही अधिकारी व्हावेत ; आमदार विक्रमसिंह सांवत | न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळचा सुवर्ण महोत्सव उत्साहातजत,प्रतिनिधी : एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या संस्थेचे  सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करताना अनेकांना याचा सार्थ अभिमान वाटत असतो.मुळात आपला जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन  उच्च पदावर गेली पाहिजेत,हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन संस्था चालकांनी ही संस्था उभी केली.या संस्था चालकांप्रती  सर्वानीच ऋणी असले पाहिजे.गेल्या पन्नास वर्षात कठीण परिस्थितीत  माडग्याळ येथील शाळेत शिक्षण घेऊन काही जण उच्च पदावर नोकरी करीत  आहेत.ही शाळेची अभिमानस्पद कामगिरी आहे.शाळेच्या यापुढील काळात अनेक विद्यार्थी घडून शाळेचा नावलौकिक आणखी वाढावा अशी अपेक्षा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केली.
ते जत तालुक्यातील माडग्याळ येथील न्यू इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.मदन बोर्गीकर,अप्पर सचिव सतीश माळी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जी.बी.ऐनापुरे,उपसभापती विष्णू चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,महिला बाल-कल्याण सभापती सुनीता पवार,जि.प.सदस्या स्नेहलता जाधव,अँड.प्रभाकर जाधव सरपंच आप्पू जत्ती,जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,नाना शिंदे,युवराज निकम,गणी मुल्ला आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की,शिक्षणाची ज्ञानगंगा खऱ्या अर्थाने गावोगावी ज्यांच्यामुळे पोहचली त्या महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांचा आदर्श व जयघोष सर्वानीच केला पाहिजे.तसेच या शाळेसाठी ज्या दानशूर व्यक्तिनीं जमीन दान केली ते निकम,सावंत यांना धन्यवाद दिले पाहिजेत.सध्या शिक्षण क्षेत्रात शासनाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानवादी बनवले पाहिजे.या शाळेत शिक्षण घेऊन जे उच्च पदावर कार्यरत आहेत,काहीजण उद्योग व्यवसायात आहेत अशानी शाळेकडे लक्ष दिले पाहिजे.आपल्या जन्मभूमीकडे लक्ष देत काहीतरी योगदान दिले तर जीवन सार्थकी लागते असे शेवटी जगताप म्हणाले.
डॉ.मदन बोर्गिकर म्हणाले की,या संस्थेच्या उभारणीसाठी माडग्याळ येथील सर्वच नागरिकांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य गेल्या पन्नास वर्षात केले आहे.हे सहकार्य कधीही विसरता येणार नसून येथून पुढच्या काळात अशाच पद्धतीने सहकार्य व मदत देण्याचे आवाहन डॉ.बोर्गिकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात गीत-गायनाने झाली.तर याच शाळेतील विद्यार्थी शिवतेज जाधव व त्यांच्या साथीदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला.या कार्यक्रमाला यावेळी मुख्याध्यापक एस आय हिरगोंड,एन डी बिरनाळे,प्राचार्य कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष जी.बी.ऐनापुरे, उपाध्यक्ष डॉ.मदन बोर्गीकर व आण्णय्या स्वामी,सेक्रेटरी डॉ.शंकर तंगडी,जा.सेक्रेटरी बाळेशा मंगसुळी , खजिनदार देवेंद्र पोतदार,संचालक डॉ.श्रीशैल कन्नुरे,संभाजी माळी,गुरुनाथ बीज्जरगी,डॉ.सी.बी.हिट्टी उपस्थित होते.
 
 
 
माडग्याळ : न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात बोलताना आ.विक्रमसिंह सांवत,व्यापिठावर माजी आमदार विलासराव जगताप,जी.बी.ऐनापुरे,अप्पर सचिव सतीश माळी Blogger द्वारे प्रायोजित.