Header Ads

मोहन माळी इंटरनँशनल स्कूल ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडवील ; तहसीलदार गोरे | वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहत संपन्न


कवठेमहांकाळ : अभिनव फाऊंडेशन संचलित मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक संकुलाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रमुख पाहुणे कवटेमहांकाळचे तहसीलदार डी.जे.गोरे यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने सुरूवात झाली.त्यावेळी जतचे तहसीलदार सचिन पाटील,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,भगिरथीआईचे संस्थापक श्री.चव्हाण सर, संस्थापक अध्यक्ष मोहन माळी,सचिव सौ.नेहा माळी,श्रेयस सुनिल माळी, कोशाध्यक्ष युवराज माळी,नंदकुमार माळी,सौ.अश्विनी माळी,वैशाली सेवेकरी,अँडमिनिस्ट्रेटिव्ह सचिन कदम,पालक प्रतिनिधी सौ.लक्ष्मी भोसले आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,विभाग,जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धात पारितोषिक मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्याचा,स्कूलमधील आदर्श शिक्षक,कर्मचाऱ्यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तहसिलदार डी.जे.गोरे म्हणाले,ग्रामीण भागात अत्याधुनिक व उच्चस्तरीय शिक्षणाचे मोहन माळी इंटरनॅशनल स्कूूूूल हे संकूल उभे करून मोहन माळी यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.मुंबई,पुण्यासारख्या सुविधा या स्कूलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे या शैक्षणिक संकुलातून घडणारा प्रत्येक विद्यार्थी चारित्र्यसंपन्न व भारताचा आदर्श नागरिक असेल,संस्थेची शैक्षणिक, क्रिडा,उच्चतम शिक्षण पध्दती,व निसर्गरम्य परिसर ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडवील एवढे निश्चित असल्याचे गोरे शेवटी म्हणाले.मोहन माळी म्हणाले,संस्थेची वर्तमानातील कार्यप्रणाली व भविष्यातील यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा सांगितला. विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाचा दिवा प्रज्वलित केला. स्कूलच्या स्थापनेपासूनचा इतिहास आणि शाळेची जडणघडण अर्थातच शाळेची प्रगती कशी होत गेली,विद्यार्थांना 24 तास शैक्षणिक वातावरण मिळावे म्हणून बोर्डिंगची सोय करणार असल्याचे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असे कलाविष्कार सादर केले तसेच अतिव सुंदर असे सुप्त कलागुण दाखवले त्यामध्ये मुलगी वाचवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा,शहिद जवानांना मानवंदना देणारे नृत्य,माझ्या राजाला साथ द्या थीम,महाराष्ट्राचे लोकप्रिय दैवत खंडोबाचा महिमा दाखवणारे वाघ्यामुरळी नृत्य अशा नृत्य कला सादर केल्या.सूत्रसंचालन पी.जे.कलमडे  व लीना वसमाले यांनी केले.नियोजन अरुण अब्राहम यांनी केले. .


 

Blogger द्वारे प्रायोजित.