Header Ads

जलसंपदा मंञ्याकडून जतवर अन्याय ; माजी आमदार विलासराव जगताप | तत्वत:मंजूर पाणी योजनेला डावलले


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पुर्व सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या भागासाठी तत्वता मंजूरी मिळालेल्या योजनेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील आरग,नरवाड,बेडग व लक्ष्मीवाडी योजनेला मंजूरी दिली आहे.




जतवर यापुर्वी जतचे हक्काचे पाणी अडवून स्व.आर.आर.पाटील यांनी निधीसह पाणी पळविले होते.आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील पुन्हा त्याचप्रमाणे काम करत आहेत,असा आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केला.जगताप म्हणाले,मंत्री पाटील यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील यांच्यावर जतच्या जनतेचे अपार प्रेम होते.त्याचे उत्तरदायित्व स्विकारत बापूंनी शेवटपर्यत दुष्काळी जनतेच्या कळीचा मुद्दा असलेले पाणी व अन्य प्रश्नासाठी काम केले.खुजगाव धरण करण्यासाठी त्यांनी तत्कालीन सरकारकडे संघर्ष केला.दुदैव्याने त्यावेळी खुजगावचे धरण झाले नाही.अन्यथा जत तालुका कृष्णेच्या पाण्याने समृध्द झाला असता.एकीकडे दुष्काळी जनतेसाठी आयुष्य घालविलेले स्व.बापू तर दुसऱ्या बाजूला बापूचे चिंरजिव जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असतानाही बापूचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी असतानाही ती घालवित आहे.खुजगाव धरणासाठी नव़्याने प्रयत्न करणे,दुष्काळी जत तालुक्यात पाणी देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्याकडे जतला पाणी आणण्यासाठी ताकत आहे.त्यांनी ती पुर्ण करावी.




माजी आमदार जगताप म्हणाले, जत तालुक्यातील सिंचन योजनेसाठी देश स्वतंत्र झाल्यापासून अन्याय झाला आहे. आजही जत तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते.प्रत्येक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.आघाडी सरकारने कायम जतवर अन्याय केला आहे. गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारच्या काळात मी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून योजनेला गती दिली.त्यामुळे कामे गतीने झाली आहेत. योजनेचे काम अतिंम टप्यात आणले.त्यामुळे जतचा पाणी प्रश्न काही प्रमाणात संपत आहे.राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील जयंत पाटील जलसंपदा मंत्री आहेत.त्यांच्याकडून आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.मी स्वत: पुढाकार घेऊन सहाशे कोटीची म्हैसाळची विस्तारित योजना प्रस्तावित केली होती.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत:मंजूरी दिली होती.खरेतर या योजनेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रथम प्राधान्य देण्याचे गरज होती.या योजनेमुळे जत तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.त्यामुळे पाटील यांनी या योजनेला प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी द्यावी,असेही माजी आमदार जगताप म्हणाले


 


जतवर सातत्याने अन्यायचं



जत तालुक्यातील योजनेला बगल देत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील आकराशे हेक्टर लाभ क्षेत्र असलेल्या लिप्ट योजनेला मंजूरी दिली आहे.त्यामुळे पाण्यासाठी पाच तपापासून संघर्ष करणाऱ्या जत तालुक्यातील जनतेवर पुन्हा अन्याय झाला आहे. असेही माजी आमदार जगताप म्हणाले.



Blogger द्वारे प्रायोजित.