Header Ads

जतमध्ये ऑप्टीकल फायबर इंटरनेट सेवा सुरू 


 


 

जत,प्रतिनिधी : ऑप्टीकल फायबर केबलच्या माध्यमातून केबल जाळे पसरले आहे. आता इंटरनेट सुविधाहि या माध्यमातून जत शहरात जाधव ब्रॉडबँड या नावाने इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली.

यामुळे नेटवर्कचे सिग्नल नसलेतरी इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आहे.

एक रुपयाला एक जीबी इतक्या कमी शुल्कात इंटरनेट सुविधा मिळणार आहे. अत्यंत माफक दरात ही इंटरनेट सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. जत दूरदर्शन या केबल व्यवसायाच्या माध्यमातून जत शहरात केबल जाळे पसरले आहे. याच केबलमधून इंटरनेटची सुविधा आता देण्यात येणार आहे. केबल खुदाई झाल्यानंतर नेटवर्क गेल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. आता मात्र या सुविधेमुळे अखंडीत इंटरनेट सुविधा मिळणार आहे. केबलच्या माध्यमातून ज्याला इंटरनेट सुविधा पाहिजे असेल त्यांना डोंगल व वाय-फाय मशीन देऊन त्याव्दारे ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. जे लोक जास्त इंटरनेट वापरतात त्यांना ही सुविधा परवडणारी आहे. ऑफीस, कार्यालये, व्यवसायिक अशांना तर ही इंटरनेट सुविधा परवडणारे आहे. तसेच एकाच घरात चार लोकांकडे अण्ड्रोइड मोबाईल व कंप्यूटर असेल तर सर्वच जण एकाच वेळी इंटरनेट वापरू शकतात. या इंटरनेट सुविधेचा जतवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राहुल जाधव यांनी केले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.