Header Ads

भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे होतेय परिसरात जत गुटखा विक्री


जत,प्रतिनिधी : शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरवण्याचा काम सुरू केलं आहे.महाराष्ट्र सरकार ने गुटखा विक्री वर बंदी आणली मात्र ही बंदी कागदावरच असल्याचं जिल्हाभर दिसून आलं आणि असाच गुटखा व्यवसाय पैठण तालुक्यात मध्ये जोरात सुरू आहे .पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.सर्वत्र होलसेल गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे भरदिवसा दुचाकी वर बॉक्स टाकून बिनधास्त लागेल त्याला माल पुरवला जातो.संबधीत खात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होण्याची चिंता नाही त्यामुळे  गुटखा विक्रेता दिवस-रात्र गुटखा विक्री करत आहे.छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळेझाक करण्याची भूमिका घेत  आहे. राज्यातील फडणवीस सरकारने गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्री वा साठेबाजीत सहभागी असणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही जिल्हात अन्य भागांप्रमाणेच जत तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.


 

पोलिसांनी पकडलं तर ‘मै हू ना….’
एका गुटखा होलसेल करणाऱ्या विक्रेत्याशी आम्ही बातचीत केली असता, कोणालाही गुटखा व्यवसाय मध्ये येण्यासाठी आधी अन्नप्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटावं लागत. तरीही पोलिसांनी कारवाई केली तर पंचनामा करून अन्नप्रशासन कडेच पाठवला जातो त्यामुळे पोलीस कारवाई झाली तरी आमच्याच हातात आहे काय करायचं ते …असं आश्वासन अन्नप्रशासनाकडून देण्यात येते असं  एका गुटखा विक्रेत्याने सांगितलं.


Blogger द्वारे प्रायोजित.