Header Ads

फिरोज मुल्ला यांनी उमदी जि.प.ची निवडणूक लढवावी


 

उमदी,वार्ताहर : उमदी जिल्हा परिषद रिक्त जागेवर उमदीचे राष्ट्रवादीचे नेते फिरोज मुल्ला यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत हे विधानसभा सदस्य झाल्याने सावंत यांनी उमदी जि.प.सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.त्या रिक्त जागी निवडणूक होणार असून इच्छुकांची गर्दी वाढत असली तरी फिरोजभाई मुल्ला यांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी उमदी परिसरातून जोर वाढत आहे. 

फिरोजभाई मुल्ला हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत.होतकरू,मनमिळावू अशी त्यांची ओळख आहे. यांनी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून म्हैशाळ सिंचन पाण्यासाठी, किसान सन्मान अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपोषण केले आहेत, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे त्यांनी केले आहेत. 

सर्वसामान्यांचा समस्या सोडविण्यासाठी गट-तट पक्ष-पात न मानता दिवस-रात्र सर्व सामान्य लोकांची कामे करण्यात मग्न असणाऱ्या फिरोजभाई मुल्ला यांनीच जि.प.निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. 

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.