Header Ads

इंटरनेट गुल,रेंजही येईना | जत तालुक्यात मोबाईल कंपन्याचा खेळखंडोबा

 



जत,प्रतिनिधी : मोबाईल कंपन्यांच्या बंद पडलेल्या टॉवर्समुळे मोबाईलवरुन केलेला कॉल जोडला जात नाही तसेच इंटरनेटला वेगही हवा तसा मिळत नाही. त्यामुळे मोबाईल ग्राहकांनाच  मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे.जत तालुक्यात मोबाईल ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे विविध कंपन्यांनी टॉवर उभारुन नेटवर्क देण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून होडाफोन,आयडीया,एअरटेल,बिएसएनएल कंपनीच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याने केलेले कॉल वाया जात आहेत. फोनच लागत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. जर लागलाच तर समोरच्याकडून प्रतिसाद मिळाला की नाही हेच समजत नाही. फोर जी,फाईव्ह जी च्या जमान्यात या कंपनीकडून टू जी चेदेखील डेटा स्पीड मिळत नसल्याचे मोबाईल धारकांकडून सांगण्यात येते.जीओ मोबाईल कंपनीशी स्पर्धा करताना या कंपनीने ग्राहकांसाठी विविध सुलभ स्वत प्लॅन आणले.त्यांचेही दर आता दुप्पट झाले  आहेत.अनेक गावात टॉवर असून देखील ग्रामीण भागात रेंजच मिळत नसल्याने मोबाईल ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. त्यामूळे कंपनीने ग्राहकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.चांगली सेवा उपलब्ध करुन द्यावी अन्यथा टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोबाईल धारकांनी आहे.


 


Blogger द्वारे प्रायोजित.