Header Ads

बनशंकरी नर्सरीचे काकासाहेब सांवत'आदर्श सेवा'पुरस्काराने सन्मानीत

 



 




बनशंकरी नर्सरीचे काकासाहेब सांवत'आदर्श सेवा'पुरस्काराने सन्मानी

 

जत,प्रतिनिधी : अंतराळच्या श्री.बनशंकरी नर्सरीला सीबीएस न्यूज चॅनल व युवा पत्रकारीता असोसिएशन यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्रातील "आदर्श सेवा" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अंतराळ ता.जत येथील युवा शेतकरी काकासाहेब सावंत यांनी त्यांच्या दोन शिक्षक बंधूंच्या सहकार्याने अंतराळ येथील खडकाळ माळरानावर सुमारे पंधरा एकर फळबाग जोपासली आहे.विविध प्रकारची फळ झाडांची कलमे व रोपे यांचे दर्जेदार उत्पादन करून परिसरातील शेतकऱ्यांना योग्य किंमतीत उपलब्ध करून दिली आहेत त्यांच्या कार्याची दखल सांगोला येथील सीबीएस न्यूज चॅनल परिवार व युवा पत्रकार असोसिएशन यांनी घेतली व कृषी क्षेत्रातील आदर्श सेवा पुरस्कार देऊन काकासाहेब सावंत यांचा यथोचित गौरव करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी पंचायत समिती सांगोला याठिकाणी माजी आमदार दीपकआबा सांळुखे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रंचड दुष्काळी परिस्थिती असतानाही तब्बल दहा किलोमीटर वरून पाईपलाईन द्वारे पाणी आणून सांवत बंधूनी दुष्काळी भागातील नंदनवन फुलविले आहे.भविष्यातील कृषी पर्यटन स्थळ म्हणून बनशंकरी नर्सरी उदयास येत आहे.कृषी क्षेत्रातील गुंतवणूक अडचणीची ठरत असताना सावंत यांनी दुष्काळी भागात शेती क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत योग्य प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारची रोपवाटिका विकसित करण्याचे कठीण काम  धाडसाने केले. त्यामुळे परिसराचा संपूर्ण कायापालट झाला असून संपूर्ण क्षेत्र हिरवेगार बनले आहे.पर्यावरण रक्षणाचे महत्वाचे काम सावंत यांनी केले आहे हे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून दुष्काळी भागात इतर शेतकऱ्यांना सुद्धा दिशादर्शक आहे,असे मत चांदभाई शेख यांनी यावेळी व्यक्त केले.

 

 

बनाळीच्या श्री.सावंत कुटुंबियांनी गेल्या दहा वर्षांपासून प्रामाणिकपणे केलेल्या कठोर
परिश्रमातून प्रतिकूल परिस्थितीतही पंधरा एकरात आंबा, डाळिंब, चिकू, पेरु,लिंबू, चिच, सीताफळ,आवळा,जांभूळ यांच्यासह नारळ, काजू, फणस, सुपारी,अननस ही कोकणातील फळझाडे तसेच लवंग,दालचिनी, मिरी अशी मसाले पदार्थची झाडे जोपासली आहेत.सांवत यांच्या नर्सरीत सुमारे 20 हजाराहुन अधिक फळझाडे आहेत.ऐन ऊन्हाळ्यातही निसर्गाचा हा हिरवागार परिसर शेतकऱ्यांना भुरळ पांडत आहे.या नर्सरीत नव्या पध्दतीने तयार केलेली आंबा रोपे प्रसिद्ध आहेत.

 

सांगोला येथे बनाळी ता.जत येथील बनशंकरी नर्सरीचे काकासाहेब सांवत'आदर्श सेवा'पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

 

 

 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.